आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Crore 13 Lakh Rupees Proposal Was Sent By Department Of Archaeology

मार्ग सुकर: मंदिर जतनासाठी पुरातत्त्व खाते सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साताऱ्यातील खंडोबा मंदिराच्या जतन दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागातर्फे नुकताच एक कोटी १३ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनीही मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण मंदिर गावाला जोडणारा पूल लवकरच बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.
अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाली आहे. यासंदर्भात अनेकदा पुरातत्त्व खात्याला तसेच लोकप्रतिनिधींना साकडे घालण्यात आले. मात्र आश्वासनाशिवाय बोळवण करण्यात आली. मागील आठवड्यात मंिदरासमोरील दीपमाळेचा काही भाग पडला मंदिराच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर २८ जूनला पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी केली. तसेच ३० जून रोजी महापौर तुपे यांनीही पाहणी करून मंदिराच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले होते.
यात्रेच्या काळात खंडोबा मंदिराला जवळपास सहा लाख भाविक येतात. शहरालगत असले तरीही परिसरामधून मंदिरापर्यंत जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने भाविकांचे हाल होतात. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण होत आहे. पुरातत्त्व खात्यातर्फे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच काम सुरू होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अशी होईल दुरुस्ती
- १.१३ कोटी रुपयांचा प्रस्ताव
- कन्नड जिल्ह्यातील गावातून दगड मागवणार
- दगडी सभामंडप उभारणार
- मंदिर आवारात दगडी फरशी बसवणे, जोत्याचे जोत्यावरील कोरीव बांधकाम दगडांचे बांधकाम करण्यात येणार
- शिखराच्या पडलेल्या भागाचे वीटकाम करणार
- गर्भगृहात शिखराला बाहेरील बाजूने लाइम प्लास्टर करणार
- दीपमाळेचे बांधकाम करणार
असा असेल पूल
एमआयटी महाविद्यालयाकडून मंदिराकडे जाणारा रस्ता गावात प्रवेश करताना येणारा उतार या ठिकाणी पूल करण्यात येणार आहे. यास अंदाजे ४० लाख रुपयांचा खर्च येईल. हा रस्ता ५०० मीटरचा आहे. तसेच कलवर्ट पाइप वापरून पूल उभा करणार असून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाईल. कोंडवाड्याची जागा पार्किंगसाठी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.