आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी एक कोटी, वातानुकूलन यंत्रणा दुरुस्तीची कामे होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अत्यंत वाईट अवस्था बनलेल्या संत एकनाथ रंगमंदिराच्या एसी देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीच एसीसाठी ५५ लाखांचे टेंडर काढूनही मनपाने काम केल्याने हे काम या वेळी तरी होईल का, असा प्रश्न रंगकर्मी रसिकांनी उपस्थित केला आहे.

मराठवाड्यातील एकेकाळच्या सर्वात चांगले नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराची मागच्या तीन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. तुटलेल्या खुर्च्या, खराब ध्वनियंत्रणा, केव्हाच बंद पडलेली एसी यंत्रणा, खराब झालेले स्टेज, वाईट अवस्थेतील ग्रीन रूम अशी दैना या रंगमंदिराची झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील रंगकर्मी रसिकांनी या दुरवस्थेबाबत आवाज उठवूनही मनपाने काहीच केले नाही. आर्थिक टंचाईमुळे रंगमंदिरावर पैसे खर्च करणे मनपाने टाळले. शेवटी मुंबई आणि पुण्याच्या कलावंतांनीही रंगमंदिराच्या दुरवस्थेवर टीका करीत तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर शहरातील रंगकर्मी एकत्र आले त्यांनीही त्या त्या वेळच्या आयुक्तांना साकडे घातले. सर्वसाधारण सभेआधी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य यांनी हा विषय काढला. आता कोणत्याही परिस्थितीत रंगमंदिरातील कामे झाली नाहीत तर नागरिकांना तोंड दाखवणे अवघड होणार आहे, असे सांगत त्यांनी या कामांसाठी तातडीने निधी देण्याची मागणी केली.

वैद्य यांचा पाठपुरावा
दोनवर्षांपूर्वी या भागाचे नगरसेवक राजू वैद्य यांनी रंगमंदिराचा प्रश्न लावून धरत एसीच्या कामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या कामाचे टेंडरही निघाले, पण पुढे काहीच झाले नाही. आता पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे.
बातम्या आणखी आहेत...