आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबाद पालिकेला एक कोटीचे बक्षीस, शौचालयाचे दिलेले उद्दिष्ट केले पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- नगरपालिकेने शहरातील शौचालयाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. खुलताबाद शहर शंभर टक्के हागणदारी मुक्त झाल्याबद्दल पालिकेला एक कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी नगराध्यक्ष एस. एम. कमर व मुख्याधिकारी सविता हारकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले असून एक कोटीचे बक्षीस  दिले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत  ८०२ शौचालये बनविण्याचे उद्दिष्ट खुलताबाद नगरपालिकेला देण्यात आले होते.  त्यानुसार खुलताबाद नगरपालिकेकडून नगराध्यक्षा खमर व मुख्याधिकारी हारकर यांनी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये गुड मॉर्निंग पथक प्रमुख बी. एम. तांबरे यांच्यासह नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ यांनी खुलताबाद शहरात कोणी उघड्यावर जाऊ नये यासाठी बँड वाजवून उघड्यावर बसण्यास मज्जाव केला.  उघड्यावर बसणाऱ्यास गुड मॉर्निंग पथकाकडून नोटिसा देण्यात आल्या.  विविध शाळांच्या वतीने  रॅली कडून प्रत्येक कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी प्रवृत्त केले.  प्रत्येकी शौचालयासाठी पालिकेतर्फे १५ हजार रुपयांप्रमाणे  ८०२ शौचालयासाठी  १ कोटी २० लाख ६० हजार देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...