आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारेला स्पर्श होऊन तरुणाचा मृत्यू; वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करतांना घडली घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- तालुक्यातील किनगाव येथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाच्या कामात श्रमदान करत असताना एका २६ वर्षीय तरुणाला विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (१३ एप्रिल) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. विनय प्रल्हाद चव्हाण (२६, रा.किनगाव, ता.फुलंब्री) असे विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
  
तालुक्यातील आदर्श गाव किनगाव येथे हे पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले असून या स्पर्धेत श्रमदानातून गावाजवळील टिटवी नदीपात्राचे खोलीकरण-रुंदीकरणाचे काम ग्रामस्थ करत होते. त्यात मृत विनय चव्हाण याचाही सहभाग होता. जलसंधारणाच्या या कामात नदीपात्रातून  काढण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळून विद्युत तार गेलेली होती. या तारेला विनय चव्हाण याचा स्पर्श होऊन तो जखमी झाला. त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. त्याचा उपचार सुरू असताना  रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   

आदर्श गाव किनगावच्या विविध योजनांत विनय चव्हाणने समाजकार्य करून हिरिरीने भाग घेतला. त्याच्या निधनाने किनगावात शोककळा पसरली आहे. गणोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण व मुंबईचे सार्वजनिक बांधकाम अभियंता अतुल चव्हाण, भाजपचे नेते तथा उपसरपंच कल्याण चव्हाण यांचा पुतण्या, तर किनगावच्या माजी सरपंच इंदुबाई चव्हाण यांचा मुलगा होता.
बातम्या आणखी आहेत...