आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोहताना हृदयविकार; एकाचा मृत्यू, एमजीएम जलतरण तलावातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमजीएम संस्थेतील जलतरण तलावात पोहताना हृदयविकाराने रमेश मुरलीधर घोडके (४५) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ६.४५ वाजता घडली. 

पोलिसाच्या माहितीनुसार रमेश यांनी आठवडाभरापूर्वी स्विमिंगचा कोर्स लावला होता. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते मित्रांसोबत पाेहण्यासाठी गेले. पोहत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते पाण्यातून बाहेर आले. भोवळ आल्याने ते खाली पडले. तेथील सुरक्षारक्षक मित्रांनी त्यांना तत्काळ बाहेर काढले. 

पुन्हा कोसळले 
घोडके पोहल्यानंतर पायऱ्यांनी पाण्यातून बाहेर येत होते. भोवळ येऊन पुन्हा पाण्यात पडले. लाइफगार्डने त्यांना बाहेर काढले. तेथे उपस्थित दोन डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून रुग्णालयात हलवले होते. 
- मनीष पोलकम, व्यवस्थापक, एमजीएम जलतरण तलाव. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...