आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास बनला मृत्यूचा मार्ग; ट्रकने घेतला तरुणाचा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बीडबायपास रोडवरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हायवा ट्रकखाली सापडून दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच अंत झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अमोल धोंडिराम साळवे (१८, रा. जयभवानीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर स्वप्निल देवराव भालेराव (१८, रा. अालोकनगर) या जखमीवर घाटीत उपचार सुरू आहेत. दुचाकीवर तिसराही मित्र होता. मात्र, तो कुठे गेला हे माहीत नसल्याचे स्वप्निलने सांगितले. 

अमोल हा मजुरीचे काम करत होता. रविवारी तो दोन मित्रांसह एमएच २० बीडब्ल्यू ३६५४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून देवळाई चौकाकडून पैठण रोडकडे जात होता. अमोल दुचाकी चालवत होता. त्यांची दुचाकी एमएच २० डीई ६९३५ क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या उजव्या बाजूने जात होती. गतिरोधक असल्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमोलची दुचाकी ट्रकवर आदळली तो थेट ट्रकच्या चाकाखाली सापडला, तर स्वप्निल विरुद्ध दिशेला पडला. या दोघांनाही उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी अमोलला तपासून मृत घोषित केले. स्वप्निल मात्र काही वेळ बोलत होता. आमच्यासोबत तिसरा मित्र असल्याचे त्याने सांगितले. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 
बातम्या आणखी आहेत...