आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव मार्गावरील अरुंद पुलाने घेतला पुन्हा बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर- भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगाव-औरंगाबाद मार्गावरील तलवाडा घाटात शुक्रवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास घडली. नांदगाव मार्गावरील अरुंद पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेल्या गंगाधर लक्ष्मण वरपे (रा. कानडगाव, ता. कन्नड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर महादू वरपे (रा. शिऊर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, पूल परिसरात एका महिन्यात सात जण ठार झाले.

वरपे हे आपल्या दुचाकीने मालेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने  दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीचालक महादू वरपे हे बाजूला फेकले गेले, तर मागे बसलेले गंगाधर वरपे हे अज्ञात वाहनाखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अरुंद पुलामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेण्यास जागा नसल्याने हा अपघात घडला. या अरुंद पुलामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले आहेत.
बातम्या आणखी आहेत...