आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडाचा टेम्पो उलटून एक जण ठार, चार गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर- कन्नड तालुक्यातील शिरसगाव येथून लग्नाहून परतत असताना खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात टेम्पो उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार  शिऊरजवळील शिऊर बंगला ते साकेगावदरम्यान सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. 
  
वैजापूर तालुक्यातील अंचलगाव, लोणी, चिकटगाव येथील वऱ्हाडी शिरसगाव (ता. कन्नड) येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाहून परतत असताना साकेगावजवळ रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. या अपघातात टेम्पोतील वऱ्हाडी दबले गेले. यातील वाल्मीक किसन नन्नावरे (रा. अंचलगाव) हे जागीच ठार झाले, तर ताराबाई अवचिते, छबाबाई अवचिते,(रा. लोणी), शांताबाई सोळसे (चिकटगाव), शाहुबा दणके (चिंचोली) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात  हलविण्यात आले. 

उर्वरित जखमींवर शिऊर बंगला येथील आनंदपुष्प हॉस्पिटलमध्ये  डॉ. आबासाहेब जाधव यांनी प्रथमोपचार करून जखमींना घाटीत हलविले. या अपघातात मनोज कसबे, अंकुश नन्नावरे, उत्तम मोहिते, संजय नन्नावरे यांच्यासह लहान बालके, वृद्ध, महिलांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...