आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाळूज एमआयडीसीतील एका कंपनी कामगाराला गोलवाडी फाट्याजवळ भरधाव इंडिका कारने चिरडले. सुमारे पाचशे मीटरपर्यंत दुचाकीस्वाराला फरपटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. फय्याज हारुण कुरेशी (३२, रा. समतानगर) असे त्याचे नाव असून ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.

फय्याज कुरेशी वाळूज एमआयडीसीतील नवकेतन फार्मास्युटिकल्स कंपनीत आॅपरेटर होता. सकाळी (एमएच २० बीटी ६३२६) या दुचाकीवरून तो कंपनीकडे निघाला होता. गोलवाडी फाट्याजवळ नगरहून येणाऱ्या इंडिकाने (एमएच १४ जीव्ही ५२९२) त्याला समोरून धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने धूम ठोकली. छावणी ठाण्याचे पोलिस निरीक्षक गौतम फसले, उपनिरीक्षक दिनेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. छिन्नविच्छिन अवस्थेतील फय्याजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आला. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.