आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : फोटो काढताना तोल गेला; मोमबत्ता तलावामध्ये बुडून महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो काढल्यानंतर काही क्षणांनी जगदेवी तलावात पडल्या. - Divya Marathi
हा फोटो काढल्यानंतर काही क्षणांनी जगदेवी तलावात पडल्या.
दौलताबाद- दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावात पाय घसरून पडलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. जगदेवी स्वामी (४५, रा. रामनगर) असे त्यांचे नाव असून, फोटो काढताना तोल जाऊन त्या तलावात पडल्या. 

स्वामी कुटुंबीय सोमवारी सकाळी दौलताबाद परिसरात फिरण्यासाठी गेले होते. जगदेवी यांच्यासोबत पती बसवराज राजाराम स्वामी, मुलगा मिथुन सून प्रतीक्षा होते. एका हॉटेलमध्ये जेवण करून दुपारी सर्व जण मोमबत्ता तलावाकडे गेले. तेथे ग्रुप फोटो, सेल्फी काढत होते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या असून तेथे फोटो काढत असताना अचानक जगदेवी यांचा पाय घसरला त्या पाण्यात पडल्या. हे पाहून त्यांचे पती बसवराज यांनी तलावात उडी घेतली. मात्र, खोली पाणी जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही. 

घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय मांटे, उपनिरीक्षक व्ही. जी. वडने घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे एम. एल. मुंगटे, एच. वाय. घुगे, रमेश सोनवणे, बी. जे. मावले यांनी तासभर प्रयत्न करून जगदेवी यांना तलावातून बाहेर काढले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...