आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: नारेगावात ट्रकच्या धडकेत एक ठार, एक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरधाव दुचाकी ट्रकवर धडकून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना नारेगाव कचरा डेपोजवळ रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. शेख सिद्दीक शेख चांद (१९,रा. एन चिश्तिया कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे तर सय्यद सोहेल (१९, रा. एन चिश्तिया कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शेख सिद्दीक हा त्याच्या एम एच २० सीबी ९१५२ या दुचाकीवर सोहेल याला घेऊन पीरवाडीच्या दिशेने जात होता. नारेगाव कचरा डेपोजवळ त्याची भरधाव दुचाकी एमएच २० डीई ३४५७ या ट्रकवर धडकली. दुचाकीवरील दोघे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही माहिती स्थानिकांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना दिली. ठाणे अंमलदार विठ्ठल राठोड यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलिस उपनिरीक्षक कऱ्हेवाड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना उपचारासाठी घाटीत हवलवले. मात्र शेख सिद्दीक याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. साेहेल याच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचेही वडील मजूर म्हणून काम करतात. मृत्युमुखी पडलेल्या सिद्दीकला एक भाऊ दोन बहिणी आहेत. दरम्यान ट्रकचालक रामेश्वर पांडुरंग राजाळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहायक फौजदार सांगळे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...