आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: रूळ ओलांडताना वृद्धाचा मृत्‍यू, मराठवाडा एक्‍सप्रेसने दिली धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वे खाली सापडलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२३ जून) सायंकाळीच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली. श्‍यामराव विठ्ठलराव निकम (वय ७०, रा. कन्नड) असे त्यांचे नाव आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निकम यांना घाटीत नेण्याचा प्रयत्न संजय दत्तात्रय होळकर यांनी केला. मात्र, रस्त्यातच निकम यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सुरू होती.
नेमके काय झाले ?
निकम हे रेल्‍वे रुळ ओलांडत होते. दरम्‍यान, औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी मराठवाडा एक्‍स्‍प्रेस येत होती. समोरून ट्रेन येत असल्‍याचेही त्‍यांना राहिले नाही. काही कळायच्‍या आत ते ट्रेन खाली.
संग्रामनगर उड्डाणपुलावरची वाहतूक ठप्‍प
हा अपघात बघण्‍यासाठी संग्रामनगर उड्डाणपुलावर बघ्‍यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्‍यामुळे शहानूर मिया दर्गाकडून येणारी वाहतूक खोळंबली होती. शाळा, कॉलेज व ऑफिसमधून घरी जाणाऱ्या लोकांची वर्दळ असतानाच हा अपघात झाल्‍याने काही काळ वाहतूकीची कोंडी होती.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..
बातम्या आणखी आहेत...