आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्याचा हैदोस : एका चोरट्याने दीड तासात केली पाच घरांत घरफोडी,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दीडतासात ५० मीटर परिसरात असलेल्या तीन अपार्टमेंटमधील पाच घरफोड्या करून दहा तोळे सोने आणि ५० हजार रुपये रोख लांबवण्यात आले. पुंडलिकनगरमधील स्पंदननगर या उच्चभ्रू वसाहतीत सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला. विशेष म्हणजे एकाच चोरट्याने पाच घरे फोडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी नेहमीप्रमाणे पंचनामा केला.

या भागातील गोकुळ स्वीट या दुकानाच्या पाठीमागे आसावरी, बसंत आणि आरोही अपार्टमेंट आहेत. या अपार्टमधील पाच जणांची घरे फोडण्यात आली. यातील मौलिक चावरे , विपुल वडेरा, अनिल सोनवणे ही कुटुंबे गावी गेली आहेत. प्रशांत पिसे नोकरीसाठी बाहेर गेले आहेत, तर माधुरी महाले सहकुटुंब "प्रेम रतन धन पायो' हा सिनेमा पाहायला गेल्या होत्या. अासावरी अपार्टमेंटमधील रहिवाशांना चोरी झाल्याचे कळले. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त सुखदेव चौघल, निरीक्षक नाथा जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पाच घरफोड्या झाल्याचे समोर आले.

एकाच पद्धतीने चाेरी... : पाचहीघरांची कुलपे तोडण्याची पद्धत एकसारखीच आहे. या घरांना लॅचलॉक लावले नसल्याचेही चोरट्यांना आधीच कसे कळले,असा प्रश्नही रहिवाशांना पडला आहे. रात्री आठनंतर बोलावण्यात आलेल्या श्वानपथकाला मात्र कुठलाही सुगावा लागला नाही. हा सर्व प्रकार रेकी करून केलेला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोसायटीला मागील बाजूस दोन ते तीन फुटांची संरक्षण भिंत आहे. एका बाजूने हनुमाननगर भागाकडून गेल्या पावसाळ्यात संरक्षण भिंत पडल्याने तिथूनही चोरटा आला असावा. सोसायटीला दिवसा वृद्ध सुरक्षा रक्षक असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवली जात नाही. तसेच अनोळखी माणसाला अडवलेही जात नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

क्रमअसा...
१.आसावरी अपार्टमेंटमधील दहा कुटुंबांपैकी आठ कुटुंबे गावी गेली होती. यापैकी तीन कुटुंबे आज परतही आली आहेत. चोराने आधी आसावरी अपार्टमेंटमधील सलग तीन फ्लॅट्समध्ये चाेरी केली. आमच्या घरातून साडेआठ तोळे सोने १६ हजार रुपये लांबवण्यात आले, असे दीप्ती पिसे यांनी सांगितले.

२. आरोही अपार्टमेंटमध्ये शेवटच्या मजल्यावर राहणारे सोनवणे यांचे घर फोडले. कपाट फोडताना काच फुटून चोरटा जखमी झाला; पण रक्ताने माखलेल्या हाताने त्याने चोरी केली. त्यामुळे संपूर्ण बेडरूममध्ये रक्त सांडले आहे. दरम्यान, चोराने पाण्याने जखम धूत काढता पाय घेतला. त्यामुळे घरात रक्ताचे ठसे उमटले आहेत. सोनवणेंनी गावी जाण्यापूर्वी पैसे दागिने बँकेत ठेवले होते. परंतु सोन्याचे मणी काही रोख रक्कम गेल्याचा संशय सोनवणे यांनी व्यक्त केला.

३. चोरट्याने जखमी अवस्थेत सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळील बसंत अपार्टमेंटमधील महाले यांचे घर फोडून १६ हजार रुपये रोख दीड तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. त्यांच्याच दुसऱ्या रूममध्येही चोराने कपाट फोडून काही किमती वस्तू पळवल्या. या खोलीतही चोरट्याचे रक्त सांडलेले पोलिसांना आढळून आले.

शहरातइतर दोन ठिकाणी सोन्यासह १५ हजाराची घरफोडी : पुंडलिकनगरभागात सोमवारी पाच घरफोड्या घडल्या असतानाच रविवारी गारखेडा परिसरातील गजानन कॉलनी मिसारवाडी भागात घरफोडीचे प्रकरण उघडकीस आले. गजानन कॉलनीतील संजय सोनवणे कुटूंबासह घराबाहेर गेले असता घर फोडून ४१ हजार रुपयांचा एैवज लंपास केला. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच १३ नोव्हेंबर रोजी मिसारवाडी भागातील गल्ली क्रमांक मधील बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने राेख १५ हजार रुपये पळवले आहे. याप्रकरणी जितेंद्र इंगळे यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.