आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाची स्कूटीला धडक; पत्नी ठार, पती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- लग्न सोहळ्यासाठी स्कूटीवरून जात असताना मागून येऊन अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पत्नी जागेवरच ठार झाली असून पती गंभीर जखमी झाल्याची घटना फुलंब्री-औरंगाबाद महामार्गावर मठपाटीजवळील पुलाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सुमनबाई भानुसे (६०) या ठार झाल्या असून पती एकनाथ पांडुरंग भानुसे (६५, दोघे रा. औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले. 

एकनाथ भानुसे त्यांची पत्नी सुमनबाई हे दोघे स्कूटीने (एमएच २० एआर ६६३४) लग्न समारंभासाठी हसनाबादकडे जात होते. फुलंब्रीजवळील मठपाटी पुलाजवळ मागून येऊन अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सुमनबाईंच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या जागेवरच ठार झाल्या, तर एकनाथ भानुसे यांचा पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले. फुलंब्रीच्या महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचा चालक विजय देवमाळी यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी मृत महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. एकनाथ भानुसे यांच्यावर उपचार करून त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवले, सुमनबाई यांचे शवविच्छेदन करण्यात आले. 
 
बोला बिनधास्त:- हायवेवरील मद्यालये बंदीमुक्त करण्याच्या मनपाच्या हालचालींबद्दल आपले रोखठोक मत आपण छायाचित्रांसह divyamarathi.com चे फेसबुक पेज www.facebook.com/Marathi.Divya येथे नोंदवू शकता.
बातम्या आणखी आहेत...