आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, वाळूज येथील कामगार चौकातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना वाळूज येथील कामगार चौकात रविवारी दुपारी एक वाजता घडली. सुखदेव मुरलीधर वीर (३५, रा. वाळूज) असे त्याचे नाव आहे. वीर हे दुचाकीने पंढरपूरहून वाळूजकडे येत होते. कामगार चौकात ते एका टँकरला ओव्हरटेक करत होते. तेव्हा धक्का लागून खाली पडले. याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
बातम्या आणखी आहेत...