आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पाठलाग करीत असलेल्या हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी  बघ्यांची गर्दी झाली होती.  इन्सेट : मृत संजय सांगळे. - Divya Marathi
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. इन्सेट : मृत संजय सांगळे.
वाळूज- लिंकरोड मार्गे एएस क्लब चौकातून लासूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच.२०, डी.ई.९५००)  धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.  गंभीर जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हायवा ट्रकचा पोलिस पाठलाग करत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

 संजय असरुजी सांगळे (४२,रा.म्हसोबा गल्ली, मुकुंदवाडी, औरंगाबाद), वैभव सानप (२१) व उज्वला सानप (२५,दोघे रा.रामनगर ) हे तिघे मुंबई महामार्गावरून औरंगाबादच्या दिशेने दुचाकीवर (एम.एच-२०,बी.एन.१०९३) निघाले होते. ए.एस. क्लब चौकालागतच्या छोट्या पुलाजवळ समोरून भरधाव  आलेल्या हायवा ट्रकची दुचाकीला जोरात धडक लागली. त्यात दुचाकी चालक सांगळे हे ट्रकच्या मागील चाकात सापडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या मागे बसलेल्या वैभवाचा पाय दुचाकीच्या चाकात अडकल्यामुळे तो दुचाकीसह दूरवर फरफटत गेला. सर्वात मागे बसलेल्या उज्वला रस्त्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाल्या.
एमआयडीसी ठाण्याचे  निरीक्षक नाथा जाधव तसेच सिडको वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना  खाजगी वाहनातून उपचारासाठी हलवले.  हायवा ट्रकचा पोलिस करत होते पाठलाग : प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की, या हायवा ट्रकचा पाठलाग पोलिस करत असल्यामुळे  पोलिसांना  गुंगारा देण्यासाठी ट्रकचालक समोरील वाहनांना करत होता. त्याच वेळी सांगळे यांची दुचाकी समोरून आली होती.
मृतेदह छिन्नविछिन्न : सांगळे यांच्या मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता.  संतापलेल्या नागरिकांनी हायवा ट्रकवर  दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या.  त्यानंतर ट्रकची कॅबिन पेटवून दिली. मात्र,वेळीच घटनास्थळी धावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव  कॅबिन विझविले.  हेल्मेट होते पण घातले नव्हते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...