आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वा लाख शेतकऱ्यांच्याच पीक कर्जाचे पुनर्गठन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाच्या आदेशानंतरही पुनर्गठनाची गती अतिशय संथ असून मराठवाड्यातील सात लाख ८१ हजार ४२८ शेतकरी पात्र असताना लाख २१ हजार ५९५ शेतकऱ्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पुनर्गठन होत नसल्यामुळे पालक सचिवांनी आढावा घेण्याचे आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यातच दिले आहेत.

औरंगाबाद, लातूरवगळता मराठवाड्यातील जिल्हा बँकांची स्थिती चांगली नसल्याने पुनर्गठनाचे प्रमाण कमीच असून राष्ट्रीयीकृत बँकांची गतीदेखील संथ आहे. २० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १२,७३५ शेतकऱ्यांचे १०४ कोटी ९२ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५९ हजार ७६३ शेतकरी पात्र असून २८८ कोटींचे पुनर्गठन अपेक्षित आहे. मात्र, १०४ कोटींचेच पुनर्गठन झाले आहे. जालना जिल्ह्यात पात्र एक लाख २६ हजार ६११ शेतकऱ्यांच्या ८८७ कोटी २८ लाखांच्या कर्जाचे पुनर्गठन अपेक्षित असताना ६३११ शेतकऱ्यांचे ६३ कोटी ३० लाखांचे पुनर्गठन केले आहे. मराठवाड्यातही पाच हजार ४७ कोटींचे पुनर्गठन अपेक्षित असताना आतापर्यंत ९६५ कोटी ४५ लाखांचेच पुनर्गठन झाले आहे.
३१जुलैपर्यंत मुदत : पुनर्गठनकरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यासाठी शेतकऱ्यानेच पुनर्गठन करण्याबाबतचा अर्ज बँकेला करायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्याची संमती मिळाल्यानंतर बँका कर्जाचे पुनर्गठन करणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेत, केवळ त्यांचेच पुनर्गठन केले जाणार आहे.
जिल्हा बँकांची गती संथ
मराठवाड्यातजिल्हा बँकांनी लाख ५२ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या ६५२ कोटीच्या कर्जाचे पुनर्गठन करणे अपेक्षित असताना ८६२२ शेतकऱ्यांचे पुर्नगठन केले आहे, राष्ट्रीयीकृत बँकांनी लाख ९० हजार ७८७ शेतकऱ्यांच्या ३३६७ कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करणे अपेक्षित असताना ९४,७३० शेतकऱ्यांच्या ८१४ कोटी ०८ लाखांचे पुनर्गठन केले आहे. ग्रामीण बँकांनीही १२४ कोटींचे पुनर्गठन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...