आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडापाव मालकाचे एक लाख पळवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कारचा दरवाजा लॉक न करता मोबाइल दुरुस्तीसाठी केअर सेंटरमध्ये गेलेल्या वडापाव सेंटरच्या मालकाच्या कारमधून बॅग पळवली. बॅगमध्ये 1 लाख 6 हजार रुपये रक्कम होती. ही घटना शुक्रवारी भरदिवसा क्रांती चौकात घडली. सुनील अरविंद वैष्णव (34, रा. टाऊन सेंटर, सिडको) असे या व्यापार्‍याचे नाव आहे.

वैष्णव यांनी छोटू कोल्हापुरी वडा पाव सेंटरची फँ्रचायझी घेतलेली आहे. शहरात त्यांचे 12 वडा पाव सेंटर आहेत. शुक्रवारी सव्वाबाराला ते पत्नीसह कारने (एमएच-20-पीवाय-7830) क्रांती चौकातील देवगिरी बँकेकडे जात होते. दरम्यान, पत्नीचा मोबाइल दुरुस्त करायचा असल्याने ते क्रांती चौकातील नोकिया मोबाइल केअर सेंटरमध्ये गेले. त्यांनी कारचा दरवाजा लॉक केला नव्हता. चोरट्याने संधी साधून बॅग लांबवली. बॅगमध्ये पैसे, मोबाइल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे. मोबाइल दुरुस्तीला देऊन परत आले आणि कारमध्ये बसताच बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन आंधळे करत आहेत.