आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन परतताना टेम्पोने दोघांना चिरडले; पती ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चौदा वर्षांच्या मुलाला शाळेत सोडून पती-पत्नी खुलताबाद येथील भद्रा मारुती दर्शनासाठी गेले होते. परंतु परतत असताना पडेगाव येथे समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोघांनाही उडवले. शनिवारी सकाळी १०.४५ वाजता पडेगाव रस्त्यावर ही घटना घडली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. उमाकांत मोहन मालवटकर (३३, रा. उस्मानपुरा) असे मृताचे नाव असून शिवलीला (२६) असे जखमी पत्नीचे नाव आहे.
मालवटकर दांपत्याने काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा परिसरात भाड्याने घर घेऊन राहण्यास आले होते. यापूर्वी ते क्रांती चौक परिसरात राहत होते. दोघेही पती-पत्नी बहुतांश वेळा खुलताबाद येथे मारुतीच्या दर्शनासाठी जात असत. मुलाला शाळेत सोडून दोघेही खुलताबादला गेले होते. दहा वाजता दर्शन झाल्यावर ते घरी येण्यासाठी निघाले होते. तेव्हा हा अपघात झाला.

मुलाला शाळेत सोडले अन्...
मालवटकरदांपत्य अनेकदा खुलताबाद येथे दर्शनासाठी जात असे. शनिवारी त्यांनी त्यांच्या मुलाला सोबत नेता शाळेत पाठवून दिले नंतर खुलताबादला गेले. मालवटकर यांची नऊ वर्षांची मुलगी अमरावती येथे मावशीकडे शिकते. मालवटकर खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर त्यांची पत्नी खाणावळमध्ये स्वयंपाक करण्याचे काम करते. उमाकांत यांच्यावर त्यांचे मूळ गाव लोहरा (ता. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी शनिवारी नेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...