आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाविसाव्या वर्षी अमेरिकेमध्ये मिळवले एक कोटीचे पॅकेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Img - Divya Marathi
File Img
औरंगाबाद : वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी भूषण संजय कुलकर्णी या विद्यार्थ्याची अमेरिकेतील ओरॅकल कंपनीमध्ये निवड झाली असून त्याला भारतीय चलनानुसार तब्बल एक कोटी रुपये (१ लाख अमेरिकी डॉलर) वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे. 
आयआयटी खरगपूर येथे संगणक शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत असतानाच भूषणला मिळालेले हे यश अचंबित करून टाकणारे आहे. भूषणच्या यशामुळे मराठवाड्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहे. 
नारायणा इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी भूषणचा सत्कार करण्यात आला. नारायणाचे डॉ. एम. एफ मलिक यांनी त्याची पाठ थोपटली. भूषण मूळचा उदगीरचा असून त्याचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. वडिलांचा व्यवसाय असून आई गृहिणी आहे. 
अभ्यासापासून मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा तसेच कोणतेही दडपण घेता अभ्यास करा, असा सल्ला भूषणने आयआयटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. काही गोष्टींची पूर्तता करून भूषण लवकरच कॅलिफॉर्नियातील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...