औरंगाबाद - सेव्हन हिल उड्डाण पुलावर रविवारी रात्री ११.५० वाजता झालेल्या अपघातात कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. एमएच २० सीएस ४००९ ही कार सिडको बसस्थानकाहून आकाशवाणीच्या दिशेने जात असताना उड्डाण पुलाच्या सुरुवातीला दुभाजकाच्यामधून मुख्य रस्त्यावर येण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार कारवर धडकला. कारने त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात एपी २५ एन ११७७ या अॅक्टिव्हाचा चुराडा झाला. जखमीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी गर्दी जमली. दरम्यान याच मार्गाहून जाणार्या एका रुग्णवाहिकेला थांबवून लोकांनी जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले. कारचालक वाहन जागेवर सोडून िनघून गेला. जखमीची ओळख पटू शकली नाही.