आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच स्नॅपमध्ये सामावले अखंड पाषाणातील कैलास लेणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक वारसा स्थळ असलेले अद्भुत कैलास लेणे एका अखंड महाकाय पाषाणात कोरले आहे. हौशी छायाचित्रकार प्रणव समग याने 100 फुटांपेक्षा अधिक उंचीवरून लेणीच्या टोकावरून टिपलेले आणि एकाच नजरेत बघता येणारे हे दृश्य अप्रतिम आहे.
हे छायाचित्र काढण्यासाठी त्याने 15 एमएम फिश आय लेन्सचा वापर मोठ्या खुबीने केला आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन या तिन्ही धर्मांतील देवतांच्या अत्यंत देखण्या मूर्ती या लेणीत आहेत. या लेणींची निर्मिती राष्ट्र कूट राजांनी केली आहे. प्राचीन राजमार्गावर ही लेणी निर्माण केली आहेत. ही माहिती पुरातत्त्व अभ्यासक डॉ. महेश सरोदे यांनी दिली.

एमटीडीसी व औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्सच्या वतीने वेरूळ लेणी फोटो वॉकचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 275 हौशी छायात्रिकारांनी कैलास लेणीची 1500 पेक्षा अधिक छायाचित्रे टिपली आहेत.