आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पुन्हा गँगरेप, तिसगाव शिवारात तरुणीवर तिघांचा अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादजवळील सुंदरवाडी शिवारातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेला महिनाही उलटत नाही ताेच मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिसगाव शिवारात सामूहिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेसात वाजता घडली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
साजापूर गावातील १७ वर्षीय तरुणी आणि बजाजनगरातील २५ वर्षीय तरुण तिसगाव शिवारात ए.एस. क्लबच्या अलीकडे गप्पा मारत बसले होते. हा भाग लष्कराच्या हद्दीत येतो. साडेसातच्या सुमारास अचानक तीन तरुण तेथे आले. काही कळायच्या आतच त्यांनी तरुणाला मारहाण सुरू केली. बेदम मारहाणीत तरुण जखमी झाला आणि मग हे तिघे या तरुणीला उचलून जवळच्याच एका तळ्याजवळ गेले. मुख्य रस्त्यापासून हे तळे ४०० मीटर अंतरावर आहे. तेथे या नराधमांनी तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केला.
इकडे जखमी अवस्थेत असलेला तरुणीचा मित्र कसाबसा मुख्य रस्त्यावर आला आणि वाहनांना थांबवून मदत मागत होता. बजाजनगरहून कंपनीतून परतणाऱ्या काही कामगारांनी धाव घेतली. तोवर २० मिनिटे होऊन गेली होती. काही लोकांनी तिसगावचे सरपंच अंजन साळवे यांना घटना सांगितली. तेही घटनास्थळी आले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे हवालदार भगवान जगताप व काही कामगार घटनास्थळी थांबले. धास्तावलेल्या तरुणीला त्यांनी आधार दिला. काही मिनिटांतच पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटुळे, बाबाराव मुसळे, रमेश गायकवाड, रामेश्वर थोरात, छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक साळवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव घटनास्थळी आले. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरुण व तरुणीला छावणी पोलिस ठाण्यात आणले. तरुणीच्या आईवडिलांनाही बोलवून घेण्यात आले होते. तिचे वडील मिस्त्रीकाम करतात. तरुणीच्या जबाबानंतर योग्य ती कलमे लावण्यात येतील, असे उपायुक्त परदेशी म्हणाले.
सुंदरवाडीसारखाच प्रकार :
औरंगाबादजवळील सुंदरवाडी शिवारात २७ ऑगस्ट रोजी एका शाळेमागील परिसरात २२ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी अत्याचार केला होता. ही तरुणीही आपल्या मित्रासोबतच तेथे गेली होती. मागील घडलेल्या या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुलीने चावा घेतला, डॉक्टरांकडे चौकशी
तिघा नराधमांपैकी एकाच्या हाताला मुलीने कडकडून चावा घेतला. तो रक्तबंबाळ झाला होता. जवळच एखाद्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तो गेला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. परिसरातील डॉक्टरांची रात्री पोलिस चौकशी करत होते. शिवाय घटनास्थळालगतच्या साजापूर, तिसगाव, बजाजनगरात पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. खुद्द पोलिस आयुक्त उशिरापर्यंत छावणी ठाण्यात बसून होते.
पुढील स्लाईडवर वाचा, आरोपी सराईत गुन्हेगार... तरुणी म्हणाली कुणालाही सांगू नका मी आत्महत्या करेन....