आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूरच्या मार्केटमध्ये कांद्याचे भाव झाले स्थिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा मार्केटमध्ये रविवारी चांगल्या कांद्याला ३५०० पासून ४१०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला तर गोलटी कांद्याला पंचवीसशे रुपये क्विंटल दराने नेहमीप्रमाणे येथील व्यापाऱ्यांनी उघड लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला.
बुधवारी आणि रविवारच्या कांदा बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी साडेतीन हजार ते एक्केचाळिशे रुपये असा स्थिर भाव मिळाला मागील बाजाराच्या तुलनेत चार हजार गोण्या कांद्याची आवक रविवारच्या कांदा मार्केटमध्ये घटल्याची दिसून आली.

अन्य कांदा बाजारपेठेच्या तुलनेत लासुरच्या कांदा बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला दोन पैसे जास्तच भाव मिळातो. उलट शेतकऱ्यांसमोरच उघड लीलाव पद्धतीने बोली बोलून कांदा खरेदी करून जागेवर रोखीने पेमेंट दिल्यानंतर शेतकऱ्यांचा येथील व्यापाऱ्यांवर विश्वास आहे, असा दावा कांदा अाडत व्यापाऱ्यांनी केला आहे. बुधवारच्या बाजाराच्या तुलनेत आजच्या कांदा बाजारपेठेत तीन हजार गोण्या कांद्याची आवक झाली होती. हीच आवक बुधवारी साडेपाच हजार गोण्यांपर्यंत पोहाेचली होती. अशी माहिती बाजार समितीचे सचिव किशोर पोकर्णे यांनी दिव्य मराठी शी बोलताना दिली.

ओडिशा, कर्नाटक, केरळ, तामिलनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांत कांद्याची आवक आणि उत्पन्न घटल्याने येथील कांद्याला दोन आठवड्यापूर्वी मागणी वाढली आहे. लासूर स्टेशनच्या मोढ्यात कांद्याची आवक आणि भावही वाढले होते. परंतु शेतकऱ्याकडील साठवलेला कांदा संपत आल्याने आवकदेखील आता हळूहळू घटू लागली आहे.
पुन्हा वाढ होईल
कांदा अाडत व्यापारी कैसर बागवान आणि रतिलाल मुनोत यांनी शेतकऱ्यांकडील साठवून ठेवलेला कांदा संपल्याने बाजारपेठेत आवकही कमी झाल्यामुळे पुढच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याचा भाव वाढेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.