आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा तिढा सुटेना... विद्यार्थी परेशान पालक हैराण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा तिढा सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  “सर ऑप्शन एडिट होतच नाही आता काय करु?” पार्ट टु फॉर्म लॉक दाखवतो आहे. अशा विविध प्रश्नांची आणि संकेतस्थळावर येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शिक्षण विभागात धाव घेत आपल्या समस्या मांडणारे पालक हैराण होते. तर आपला प्रवेश निश्चित होईल की नाही या समस्येने विद्यार्थी परेशान असल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.

शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन पद्धतीने होते आहे.९ जून पासून सुरु झालेल्या या प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना विद्यार्थी आणि पालकांना करावा लागतो आहे. तर १० जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहिर झाल्यानंतर १४ जुलैपर्यंत पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण करण्यात आले. परंतु या फेरीतही ६३८८ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. आजपासून दुसऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाही.त्यांना अर्ज भरण्यासाठी,चुका दुरुस्तीसाठी तसेच नव्याने ऑप्शन भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली.परंतु सकाळी १० वाजता सुरु होणारी वेबसाईट ही दुपारी २ वाजता सुरु झाली.परंतु सुरु झाल्यानंतरही वारंवार वेबसाईट हँग होत होती. विद्यार्थ्यांनी पार्ट टु फॉर्म भरतांना एडिट केलेले ऑप्शनच सेव्ह होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. ज्यांचे ऑप्शन ऑनलाइन एडिट झाले परंतु प्रिंट काढल्यावर मात्र पूर्ववतच फॉर्मची प्रिंढ निघत आहे. या सर्व प्रकारामुळे परेशान असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली असता. वेबसाईट लवकरच सुरळीत होईल. असे सांगण्यात आले. परंतू येणाऱ्या सर्व समस्यांवर शिक्षण विभागातील अधिकारी समाधानकारक आणि ठोस उत्तर देत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीही दिसून आली.

नेट कॅफेवर जा
प्रवेश प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले पाच झोन सेंटर आणि पार्ट वन फॉर्म भरण्यासाठी शाळांचे सहकार्य घ्या.अडचणी असल्यावर झोन केंद्रावर या. असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते.परंतु प्रत्यक्ष झोन सेंटरवर आलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेट कॅफेवर जावून फार्म भरा असे देखील काही झोन केंद्रांवर सांगण्यात आले. यामुळे आम्हाला अडचणी आल्या तर कुणाला विचारायचे असा प्रश्न शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थी विचारत होते.

महाविद्यालयांची बनवाबनवी सुरुच
पहिल्या प्रवेश फेरीत पात्र असणाऱ्या आणि कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना काही कॉलेजांमध्ये दिशाभूल केली जाते आहे. अनुदानित तुकडीत प्रवेश मिळत असतांना देखील सेल्फ फायनान्स अथवा विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्या असे सांगण्यात आले. त्यामुळे वेळ गेला आणि पहिल्या फेरीत प्रवेश होवू शकला नाही. अशा तक्रारी देखील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडे आज विद्यार्थ्यांनी केल्या.
बातम्या आणखी आहेत...