आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएमआयसी भूखंड वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, सर्वकाही मेरिटवर होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा डीएमआयसी (ऑरिक सिटी) येथील भूखंड वाटपाची प्रक्रिया सोमवारपासून (२८ नोव्हेंबर) सुरू झाली. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने प्रथमच सर्वकाही ऑनलाइन पद्धतीने मागवले आहे. यात अर्ज, तुमची प्रोफाइल, कागदपत्रे आणि पेमेंटसुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहे. पहिल्या दिवशी २६६ जणांचे अर्ज आले असून डीपीआर मध्ये ७५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.

डीपीआर तपासून त्या आधारेच गुण दिले जातील
डीपीआर(डिटेल प्लॅन रिपोर्ट) सविस्तर द्यावा. तोच महत्त्वाचा राहील. त्या आधारेच गुण देण्यात येतील. या गुणांच्या आधारे अर्जांची छाननी करून भूखंड वाटप समितीकडे जातील. ती समिती पुढील तारीख वेळ अर्जदारास कळवेल.
एकाच जागेसाठी अनेक अर्ज आले तर बंद बोली
एकाचभूखंडासाठी अनेक अर्ज आले तर बंद बोली (क्लोज बिडिंग) हाेईल. वाटप केलेले भूखंड साइटच्या डॅशबोर्डवर दिसतील. ते अर्जदार डाऊनलोड करू शकतील.
काय असेल जमिनीचा दर- सुरुवातीला किती पैसे लागतील?
ही जमीन टप्प्याटप्प्याने विकली जाणरअसून जमिनीचा दर हजार २०० रुपये प्रति चौ.मी. राहील. सुरुवातीला टोकन रक्कम जी ऑनलाइन भरायची आहे ती प्लाॅटच्या किमतीच्या टक्के भरावी लागेल. ती परत मिळणार नाही. हजार चौ.मी. जमिनीसाठी हजार, तर हजार चौ.मी.च्या पुढे १० हजार रुपये इतकी टोकन रक्कम भरावी लागेल. मोठ्या प्लॉटची टोकन रक्कम परत मिळणार नाही, मात्र जे छोटे प्लॉट आहेत त्याची टोकन रक्कम परत दिली जाणार आहे तीदेखील महिनाभरात.
पहिल्या टप्प्यांत ४९
पहिल्या टप्यांत ४३ एकरावरील ४९ प्लॉटचे वाटप होईल. यात मोठे प्लॉट केवळ असून ४३ प्लॉट छोटे आहेत. मोठ्या प्लाॅटचा आकार आठ हजार ते पंधरा हजार चौ.मी. असून छाेट्या प्लाॅटचा आकार ६०० ते हजार चौ.मी. पर्यंत आहे. एकूण लाख ६९ हजार ७२६ चौ.मी. एवढ्या जमिनीवर हे प्लाॅटिंग पाडण्यात आले आहे.

२७ डिसेंबरपर्यंत
ऑरिक सिटीची वेबसाइट २८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबरपर्यंत चोवीस तास सुरू राहील. २७ डिसेंबर ही शेवटची तारीख राहील. त्यापूर्वी दोन दिवस आधीपर्यंत टोकन फी प्रोसेसिंग फी भरणे सक्तीचे आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी ही सक्ती केली.
हे सर्वअर्ज डीपीआरच्या मेरिटनुसार (गुणांकानुसार) वाटप होतील. येथे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य नाही तसेच कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी नाही. आपले ई-मेल जंक मेलमध्ये गेले आहे काय, याची तपासणी अर्जदारांनी करावी. -गजानन पाटील, महाव्यवस्थापक, ऑरिक सिटी
बातम्या आणखी आहेत...