आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफआयआर ऑनलाइन टाका; माहिती आयुक्त गायकवाड यांची पोलिसांना सूचना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुन्ह्याची नोंद होताच प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) तातडीने पोलिसांच्या संकेतस्थळावर टाकावा, असे आदेश राज्य माहिती आयोगाने दिले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी स्पष्ट सूचना आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत दिले.

गायकवाड आज जिल्हा दौर्‍यावर होते. सकाळी त्यांनी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, पोलिस आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत माहिती अधिकाराच्या प्रकरणांची माहिती घेतली. त्यात त्यांनी वरील सूचना केली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर संबंधित एफआयआर लगेचच संकेतस्थळावर म्हणजेच ऑनलाइन टाकण्यात यावा, असा आदेश गायकवाड यांनी एका प्रकरणात दिला होता. त्याचे स्मरण त्यांनी संजयकुमार यांना करून दिले. कोणाविरुद्ध कोणत्या गुन्ह्याची नोंद झाली, हे जाणून घेण्याचा सर्वांनाच अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

.तर उपायुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे
देशाच्या सुरक्षेला धोका असल्यास किंवा काही गुन्ह्यांत एफआयआर सार्वजनिक होऊ नये, असे पोलिसांना वाटत असेल तर उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याने कारण संकेतस्थळावर स्पष्ट करावे, असे आदेशात म्हटले आहे.