आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यास ऑनलाइन दंडाची पावती: यशस्वी यादव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातबे दरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख ५२ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले असून त्याद्वारे दंडाची ऑनलाइन पावती देण्याचे काम सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत स्मार्ट सिटी योजनेतून पाेलिसांना निधी मिळेल. त्यानंतर शहरातील वाहतुकीत अामूलाग्र बदल होईल, असा दावा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. 


मागील काही दिवसांपासून बेदरकार वाहनांमुळे चार जणांचा मृत्यू झाला. हर्सूल टी पाॅइंट, केंब्रिज शाळेसमोरील चौक आणि बीड बायपासवरील हॉटेल आदित्यसमोर भीषण अपघात झाले होते. नियम धाब्यावर बसून शहरात जड वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवाय अॅपे रिक्षांमुळे चौकात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त यादव यांनी वाहतूक विभागाला सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसांत पाहणी केल्यानंतर वाहतुकीच्या नियोजनात मोठे बदल होतील. शहरात येणाऱ्या जड वाहनांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. परदेशात सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. तशीच प्रणाली शहरात राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात गाडीची नंबर प्लेट टिपण्याची विशेष सोय असेल. अपघात किंवा इतर गुन्ह्यांची संख्या जास्त असलेल्या चौकात कॅमेरे लावण्यात येतील. त्यासाठी एक मोठी सर्व्हर रूम उभारण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...