आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत खड्ड्यांवर आॅनलाइन !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादचे खड्डे हा सोशल मीडियावर आधी चेष्टेचा नंतर संतापाचा विषय झाल्यानंतर आता त्याला आॅनलाइन चळवळीचे रूप येऊ घातले आहे. विविध विषयांवर आॅनलाइन याचिका विविध शहरांत दाखल होत असतात. त्यात लाखो लोक या याचिकांवर सह्या करतात. आता औरंगाबादच्या खड्ड्यांवरही आॅनलाइन याचिका दाखल झाली असून त्यावर रविवारी सायंकाळपर्यंत ३७८ जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ज्वलंत विषयावर सर्वसामान्य नागरिकांना आपले मत जोरकसपणे मांडता यावे त्याची दखल प्रशासनाला घेणे भाग पाडावे यासाठी आॅनलाइन पिटिशन हा पर्याय वापरला जातो. त्यावर नागरिक आपला सहभाग नोंदवू शकतात. खासकरून नागरी समस्यांबाबत अशा पिटिशन उपयोगी असल्याचे मागील काही वर्षांत समोर आले आहे. www.change.org या वेबसाइटच्या माध्यमातून नेटकरांना आपला आवाज बुलंद करता येतो.

आता त्यात औरंगाबादच्या जगकुख्यात खड्ड्यांबाबत याचिका तयार करण्यात आली आहे. ट्विटरवरील औरंगाबाद पेजच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या याचिकेची प्रत औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एका अर्थाने ते या याचिकेचे आॅनलाइन प्रतिवादी आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत या याचिकेवर ३७८ जणांनी आपली सहमती दर्शवली होती. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे याचिकेत? : शहरातीलपर्यटनस्थळांना ऐतिहासिक वारशाला भेट देण्यासाठी येथे विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे खड्ड्यांचे शहर औरंगाबाद अशी ओळख केवळ महापालिका प्रशासनच नव्हे, तर राज्य सरकारसाठीही लज्जास्पद आहे. निर्यातकेंद्रित उद्योग, विदेशी प्रतिनिधींची औद्योगिक प्रतिनिधींची शहरात असलेली सातत्याने वर्दळ पाहता खराब आणि खड्ड्यांचे साम्राज्य असलेले रस्ते यामुळे शहराची प्रतिमा खालावत चालली आहे. त्याचा परिणाम शहरात येऊ शकणाऱ्या उद्योग व्यवसायांवर होत आहे. याशिवाय वाहतूक कोंडी, वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत चाललेले अपघात यामुळे शहराचे आर्थिक नुकसान होत आहे, उत्पादक वेळेची हानी होत आहे सामान्य औरंगाबादकरांच्या संधी दूर जात अाहेत. यामुळे आम्ही महानगरपालिका राज्य सरकार या दोघांनाही या विषयात लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करत आहोत.
बातम्या आणखी आहेत...