आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑनलाइन सातबाऱ्यावर नोव्हेंबरपासून बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तलाठी संघाला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे तलाठी संघाने ऑनलाइन सातबाराच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील १२ हजार तलाठी सहभागी होणार आहेत, अशी माहिती तलाठी महासंघाचे सरचिटणीस सतीश तुपे यांनी दिली.

तलाठ्यांना पायाभूत सुविधा मिळवून द्याव्यात तसेच लॅपटॉप आणि आणि तांत्रिक अडचणी दूर कराव्यात यासाठी तलाठ्यांनी यापूर्वी संप पुकारला होता. सप्टेंबरला झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रधान सचिव उपस्थित होते. या वेळी सुविधा पुरवण्यासह सर्व्हरची समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यावर तोडगा निघाल्यामुळे तलाठ्यांनी पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यातअॉनलाइनचा सम फाॅर्म्युला
राज्यातएनआयसीच्या सर्व्हरवर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे तलाठ्यांच्या ऑनलाइन सातबाऱ्याचा कामासाठी सम- विषम फाॅर्म्युला वापरण्यात आला आहे. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ३५७ तालुक्यांचा संगणकीकृत साताबारा डाटा ऑनलाइन करण्यात आला आहे. या डाटाचा वापर १२,६३७ तलाठी करत आहेत. अॉनलाइन डाटाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून एकाच वेळी राज्यातील तलाठी लॉगिन करत असल्यामुळे तीन डाटा सर्व्हरवर काम करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे सर्व्हरवरील ताण कमी करण्यासाठी फेरफार आज्ञावलीचे वेळापत्रक सर्व जिल्ह्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात फेरफारचे काम सम तारखेलाच करण्यात येणार आहे. केवळ पंधरा दिवस कामकाज चालणार असून सर्व्हरवरील ताण कमी होणार आहे. या विषयी २८ सप्टेंबरला परिपत्रक काढण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...