आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन सेवेत सुधारणा करू : परिवहन मंत्री रावतेंची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑनलाइन सेवेमध्ये अडचणी आहेत. मनुष्यबळ सेवा सुविधांच्या अभावामुळे लोकांची कुचंबणा होते, याची मला कल्पना आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांना अर्ज भरता येईल त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. सव्वा महिन्यात ऑनलाइन सेवा अद्ययावत होईल. तसेच आवश्यक त्या सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
राज्य परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज भरणे सक्तीचे केले आहे. अर्ज भरण्यासाठीची वेबसाइट दिवसभर कार्यान्वित होत नाही. ग्रामीण नागरिकांना शहरात आल्याशिवाय पर्यायच नाही. परिवहन मंत्री रावते यांना निवेदन देताना वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी.
प्रवाशांची अनास्था शहरातशंभर शहर बस धावत होत्या. त्यावेळी प्रवाशांना बसचे महत्त्व कळाले नाही. रिक्षा, अॅपेत असुरक्षित बसून प्रवास केला. बस रिकाम्या धावल्या. परिणामी तोट्यातील बसची संख्या नाइलाजाने कमी करावी लागली. परिवहन विभाग सेवा देण्यासाठी काम करत
आहे. पर्यटकांसाठी महानगरात अद्ययावत सेवा सुविधा असलेल्या बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्या क्षेत्रात बस धावतात पण प्रवासी बसत नाहीत, तेथील बस बंद करण्याचा विचार करत आहोत, असेही रावते यांनी स्पष्ट केले.

शिष्टमंडळ भेटले
ऑनलाइनसेवा सुरळीत करा, ऑफलाइन अर्ज स्वीकारा, नवीन इमारती उभारा आदी मागण्यांसाठी वाहन चालक-मालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष अनिल थोरात, कार्याध्यक्ष प्रकाश साठे, राजेश शर्मा, भरत चव्हाण, दीपक संभेराव, राजू बागडे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असता, सर्व मागण्या मान्य करून त्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जनरेटर मिळेल
आरटीओकार्यालयात वीज खंडित झाल्यास अनेक प्रकरणे प्रलंबित राहतात, याबाबत रावते यांना माहिती दिली असता त्यांनी त्वरित नवीन जनरेटर दिले जाईल. यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनुष्यबळ
सर्वआरटीओ कार्यालयांत मनुष्यबळ कमी आहे. ते भरण्याचाही प्रयत्न केला. लोकसेवा आयोगामार्फत रिक्त जागेची भरती करायची होती. पण ४१ उमेदवार अपात्र ठरले. यावरही लवकरच काही तरी तोडगा काढला जाईल, असे रावते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...