आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only 16 Type Foods Use In Marriage Decide In Jain Community

जैन समाजाच्या लग्न सोहळ्यात आता केवळ सोळा पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्न म्हटले की मोठी सजावट आणि पंचपक्वान्नाचा बेत ठरलेला असतो. जैन समाजाच्या लग्नात एकाच वेळी सुमारे ७० पेक्षा अधिक पदार्थ ठेवण्याचा ट्रेंड होता. त्यामुळे अन्नाची नासाडी होत होती. राज्यभरात दुष्काळाचे सावट असताना लग्नात होणारी ही अन्नाची नासाडी थांबवण्याकरिता लग्न समारंभासाठी आचारसंहिता ठरवण्यात आली असून केवळ १६ पदार्थच लग्नात ठेवावेत, असा ठराव १५ डिसेंबर रोजी राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
समाजाची आचारसंहिता मोडणाऱ्यांच्या सोहळ्यात पाहुणे जेवणार नाहीत. केवळ शुभेच्छा देऊन परततील, असा ठरावही बैठकीत घेण्यात आला. या वेळी जैन समाजातील ४०० जणांची उपस्थिती होती. शहरात जैन समाजाची सुमारे दोन हजार कुटुंबे आहेत. या सगळ्यांना हा निरोप देण्यात आला असून बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वेळी ललित पाटणी, विनोद लोहाडे, अशोक अजमेरा, दिलीप कासलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. आचारसंहिता संयोजन समितीत महावीर पाटणी, प्रकाश अजमेरा, दिलीप ठोले, चांदमल चांदिवाल, किरण पहाडे, एम. आर. बडजाते, डॉ. प्रकाश पापडीवाल यांचा समावेश आहे.
जैन समाजात लग्नाच्या अगोदर वधू आणि वरपक्षाच्या मंडळींना मंदिरात जी लग्नाची परवानगी घ्यावी लागते ितला ‘शक्कर परवानगी’ असे म्हणतात. या परवानगीच्या वेळीच दोन्हीकडील मंडळींना समारंभाची कल्पना द्यावी लागणार आहे. औरंगाबादबरोबरच राज्यभरात ही आचारसंहिता लागू राहील.