आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 176 फटाका दुकानांना परवानगी, 8 दिवसांचा व्यवसाय बुडाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगपुऱ्यातील गेल्या वर्षीची घटना आणि निवासी भागात फटाक्यांच्या दुकानांना परवानगी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश या पार्श्वभूमीवर परवानगी द्यायची की नाही, यावर काथ्याकूट चालवला होता. अखेर बुधवारी शहरात १७६ दुकानांना परवानगी मिळाली. दिवाळी सुरू झाल्यानंतर फटाका दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. आता शेवटच्या दोन दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम तरी हाती पडेल काय, याची चिंता व्यापाऱ्यांना पडली आहे.
 
मनपाने या दुकानांना पूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु पोलिस ना हरकत देण्यास राजी नव्हते. अखेरीस बुधवारी त्यातून तोडगा निघाला दुपारी ही दुकाने अधिकृतपणे सुरू झाली. निवासी भागातील टीव्ही सेंटर, सिडको एन-७ येथील राजीव गांधी मैदान, चिकलठाणा, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, छावणी येथील दुकानांना परवानगी नाकारण्यात आली. 
 
दुकानांची संख्या 
अयोध्यानगरी : ५० 
बीड बायपास : २८ 
कलाग्राम : ६८ 
सिडको एन-२ : ३० 
बातम्या आणखी आहेत...