आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Only 179 People Belongs To Bombay Blood Group In Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE: देशात बॉम्बे ब्लड ग्रुपचे अवघे 179 लोक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मृत्युशय्येवरील एखाद्या व्यक्तीला तातडीने रक्ताची गरज भासली आणि ते मिळत नसेल तर रुग्ण आणि नातेवाइकांची काय अवस्था होते याची कल्पनाही न केलेली बरी. लिव्हर सिरोसिस या यकृताचा आजाराने ग्रासलेली एक महिला तिच्या गटातील रक्त मिळत नसल्याने सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ नावाचा तिचा असामान्य गट आहे. या रक्तगटाचे देशभरात 179, तर औरंगाबादमध्ये केवळ दोन नोंदणीकृत व्यक्ती आहेत.

बहुतांश जणांना ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ अस्तित्वात असल्याची माहितीही नाही, पण अतिशय दुर्मिळ अशा रक्ताविना आशा राजेंद्र सोनवणे (48) यांच्यावर उपचार करणे अवघड झाले आहे. त्यांना गेल्या वर्षभरापासून यकृताचा आजार आहे. नाशिकमध्ये अनेक पोटविकारतज्ज्ञांचा त्यांनी सल्ला घेतला, पण फायदा झाला नाही. प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना नाशिकच्या देवगावकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण अस्वस्थता वाढल्याने दुस-या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. यकृत निकामी झाल्याने कावीळ नियंत्रित करण्यासाठी त्यांना रक्त चढवणे अतिशय गरजेचे झाले आहे. ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’साठी त्यांच्या नातेवाइकांनी जंगजंग पछाडले. राज्यभरातील प्रमुख रक्तपेढ्यांकडे विचारणा केली, पण उपयोग झाला नाही. प्रकृती अत्यंत खालावली.
त्यामुळे आशा यांचे नातेवाइक अनिल शेलार यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबईसह इतर गावातील नातेवाइकांना फोन करून ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ विषयी सर्वांना विचारले, पण सगळीकडून नकारार्थी उत्तरे मिळाली. शेलार यांनी शुक्रवारी दुपारी औरंगाबाद शहरातील महेश वाघ या त्यांच्या चुलत भावाशी चर्चा केली. त्यानंतर महेश यांनी मित्रपरिवारात कोणाचे ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे का हे तपासले, पण निराशाच हाती आली. धीर न सोडता वाघ व त्यांच्या मित्रांनी इंटरनेटवर या रक्तगटाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेथे त्यांना एक आशेचा किरण दिसला. संकल्प फाउंडेशनच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ मिळण्याची शक्यता बळावली. फाउंडेशनने शेलार यांना गुजरात आणि केरळमधील दोन व्यक्तीचे मोबाइल नंबर दिले, पण त्यातील गुजरातचा व्यक्ती परदेशात गेला होता, तर केरळमधील व्यक्तीचा रक्टगट फङ्म+ रनिघाला.

गरजूंना अतिदुर्मिळ रक्त मिळावे म्हणून 23 मे 2003 मध्ये स्थापन झालेल्या या स्वयंसेवी संस्थेने ‘अ बॉम्बे ब्लड ग्रुप कम्युनिटी’ निर्माण केली. त्याअंतर्गत कर्नाटक व इतर राज्यातील ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असणा-या व्यक्तींचा समूह तयार करण्यात आला आहे. त्यानुसार रक्त पाहिजे असल्यास संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून ते मिळवता येते. आशा यांच्यासाठीही शुक्रवारी सायंकाळी रक्ताच्या तीन युनिटसाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली आहे.

येथे मिळेल मदत : जागतिक लोकसंख्येपैकी केवळ 0.0004 टक्के नागरिकांचा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे. देशात याचे 179 लोक असून मुंबईमध्ये 35 ते 40 जण सापडतात. त्यामुळे हा रक्तगट असणा-यांनी ऑनलाइन कम्युनिटीवर रक्तगटाविषयी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. तातडीची गरज म्हणून रक्त लागल्यास bombaybloodgroup.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा sankalp.admin@gmail.com या आयडीवर मेल पाठवावा किंवा 09880132850 या क्रमांकावर संपर्क साधावा.

असे चालते संकल्पचे काम : ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ची आवश्यकता भासल्यास bombaybloodgroup.org या संकेतस्थळाला भेट देऊन किती युनिट कधीपर्यंत लागतात त्याची नोंद करता येते. ऑनलाइन नोंदणी केल्यावर संकल्पच्या प्रतिनिधीचा संबंधिताला फोन येतो. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री जाणून घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शन करण्यात येते. डॉक्टरांनी लेटरपॅडवर रक्ताची मागणी मेलवर टाकल्यास रक्त उपलब्ध असल्यास ते पाठवण्यात येते. अन्यथा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या कम्युनिटीतून विनंती करून रक्तदान करण्यास एखाद्या व्यक्तीला तयार केले जाते.

जवळपासच आहे पर्याय : ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हे दुर्मिळ रक्तगट असल्याने ज्या व्यक्तीचे हे रक्तगट आहे त्याने नातेवाइकांमध्ये अशाच रक्तगटाची दुसरी कोणी व्यक्ती आहे का ? हे तपासणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा रक्तातील नात्यांमध्ये हा रक्तगट सापडू शकतो. स्थानिक पातळीवर या रक्तगटाच्या व्यक्तींनी कम्युनिटी तयार करावी. जेणेकरून भविष्यात रक्ताची गरज भासल्यास सहज तो उपलब्ध करता येईल.

औरंगाबादेतही रक्तगट तपासण्याची सोय : औरंगाबादेतील दत्ताजी भाले
रक्तपेढीत ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ची तपासणी होते. या रक्तगटाच्या दोघांनी आतापर्यंत शहरात भाले रक्तपेढीत नोंद केली असल्याची माहिती डॉ. चौहान यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

कसा लागला शोध : केईएममध्ये एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्याला रक्ताची गरज होती.
रुग्णाचा रक्तगट ड+ होता म्हणून त्याच गटाचे रक्त चढवले जात होते. परंतु रक्त चढवताना रुग्णाला साइट इफेक्ट होत असल्याचे पाहून रक्त चढवणे तत्काळ थांबवण्यात आले. तेथेच या रक्तगटाचा शोध लागला.

काय आहे बीबीजी
प्रतिजैविके निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा जो पदार्थ असतो त्याला अँटिजन्स म्हणतात. सर्वच रक्तगटात 'H'' हा पदार्थ (अँटिजन्स) असतो. केवळ ‘बॉम्बे ब्लड गु्रप’मध्ये तो नसतो. त्यामुळे तो रक्तगट खूप कमी जणांमध्ये आढळतो. आतापर्यंत देशात या रक्तगटाचे 179 जण आढळले आहेत. यापेक्षा अधिक संख्या असू शकते. नोंदणी झाल्यावर त्याबाबत कळेल.
- डॉ. महेंद्रसिंग एच. चौहान, संचालक, दत्ताजी भाले रक्तपेढी, औरंगाबाद.

कुणी लावला शोध
1952 मध्ये मुंबईच्या डॉ. वाय. एम. बेंडे यांनी लावला शोध.

‘H’ अँटिजन्स तपासणी करावी
या रक्तगटाच्या लोकांची संख्या देशात 179 आहे. ड+ असणा-यांमध्ये हा रक्तगट आढळू शकतो. त्यामुळे रक्तदान करताना रक्तगट तपासणीसह ‘ऌ’ अँटिजन्स तपासणी करणे आवश्यक आहे. - राकेश धन्या, संकल्प फाउंडेशन, बंगळुरू.