आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतबाग झाली नो-मोर झोन, उरले 25 मोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद शहराचे शिल्पकार मलिक अंबर यांच्या काळात उभारले गेलेले मुघल गार्डन आणि आता हिमायतबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बागेकडे कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. एकेकाळी मोरांचे नंदनवन असलेली ही बाग आता “नो-मोर झोन’ बनू पाहत आहे. चार वर्षांपूवी या बागेत तीनशे मोर होते. मात्र, अमाप वृक्षतोड, मोकाट कुत्र्यांचा हैदोस अन् उपद्रवींच्या घुसखोरीने या उद्यानाची ऐतिहासिक ओळखही मिटण्याच्या मार्गावर आहे.
 
हिमायत बाग म्हणजे शहराची शान आहे. ही बाग म्हणजे सर्वात मोठा ग्रीन झोन असून वास्तुकलेचा अप्रतिन नमुना आहे. मुघल सम्राट औरंगजेब यांची ही आवडती बाग होती. त्यांनीच आंब्याच्या अनेक जातींची लागवड केली. त्या काळात सलीम अली तलावातील गाळ तेथे आणून टाकल्याने ही जमीन अधिक सुपीक झाली. या परिसरात आठ विहिरी असून येथील शक्कर बावडीला वर्षभर पाणी असते. मात्र, ही जागा टवाळखोरांचा अड्डा बनली अाहे. दररोज शेकडो लोक येथे फिरायला जातात. पण बागेची चहुबाजूंनी तुटलेली तटबंदी, तारांचे तुटलेले फेन्सिंग, दारूड्यांचा वावरयामुळे पक्षी आणि वृक्षराजी संकटात आली आहे. काटेरी झुटपे नष्ट झाल्याने लांडोरांना अंडी घालण्यास सुरक्षित जागा राहिलेली नाही.

वृक्षनि पक्ष्यांच्या अनेक जाती : यादीडशे एकरांत चिंच, वड, उंबर, पिंपळ, आंबा, जांभूळ, अंजन, नारळ, काटेसावर, कवठ, लिंब, भोकर, रिठा, कडूनिंब, आंबा अशी जुनी झाडे आहेत. मोर, मोहोळ घार, रक्तलोचन घुबड, पिंगळा, शृंगी घुबड, स्वर्गीय नर्तक, नाचरा, हळद्या, धनेश, शिक्रा, तांबट, पोपट, हरियाल यासह १२८ प्रकारचे पक्षी आढळतात.

कीटकांचे १६० प्रकार : या बनात १६० प्रकारचे कीटक, ६० पतंग, ४२ प्रकारची फुलपाखरे, प्रकारचे साप, आठ प्रकारच्या वेली आहेत. परंतु वृक्षतोड मानवी हस्तक्षेपामुळे हिमायतबाग नामशेष होत आहे.
 
इतिहासप्रेमींचा आज कँडल मार्च
इतिहासप्रेमी उद्या हिमायत बागेसह शहरातील दरवाजे ऐतिहासिक वास्तूंची होणारी पडझड याविरोधात सायंकाळी वाजता शहागंज येथील गांधी पुतळा ते मनपाने तोडलेले ऐतिहासिक खास गेट (बायजीपुरा) येथे मोर्चा काढणार आहेत. इतिहासप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
जैवविविधतेचा खजिना नष्ट होतोय
हिमायतबागही ऐतिहासिक बाग आहे. तसेच बायोडाव्हर्सिटी हॉट स्पॉट आहे. औरंगाबादमधील महत्त्वाचा ऑक्सिजन हब आहे. या बागेतील पक्षी, कीटक सरपटणारे प्राणी खातात. त्यामुळे ही बाग जतन झाली होती. मनपा आणि फलसंशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बाग शेवटच्या घटका मोजत आहे.
- डॉ.किशोर पाठक, पक्षिमित्र
 
बातम्या आणखी आहेत...