आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only 400 For Pandharpur Yatra For Aurangabad People

औरंगाबादकरांसाठी चारशे रुपयांत पंढरपूर दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विठ्ठलभक्तांच्या सोयीसाठी औरंगाबाद-पंढरपूर विशेष रेल्वे 6 व 8 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता धावणार असून, एक हजार सातशे वीस (1720) प्रवासी क्षमता असलेल्या रेल्वेचे एका बाजूचे तिकीट दोनशे रुपये राहील. परतीच्या प्रवासात उपरोक्त रेल्वे पंढरपूर येथून 7 व 9 जुलैला धावणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबादसह मराठवाड्यातील भाविकांची सोय व्हावी यासाठी विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. रेल्वे 6 व 8 जुलैला औरंगाबाद येथून रात्री 8.30 वाजता निघेल. जालना, परतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडीमार्गे गाडी पंढरपूरला 7 जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे पंढरपूर येथून 7 व 9 जुलैला रात्री 10 वाजता निघेल. औरंगाबाद स्थानकावर रेल्वे दुस-या दिवशी सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.

औरंगाबाद-पंढरपूर रेल्वेसाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण नसून रेल्वे जनरल सीटिंगची व्यवस्था आहे. एका डब्यातून 172 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था आहे. रेल्वेला 10 डबे असून दोन एसएलआर आहेत.