आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत ९.५ टक्के जलसाठा, ४.४२८ टीएमसी पाणी १५ दिवसांत झाले दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - नगर, नाशिकच्या धरणांतून एक नोव्हेंबरपासून सोडण्यात आलेल्या १२.८४ टीएमसी पाण्यापैकी जायकवाडी धरणात पंधरा दिवसांत ४.४२८ टीएमसी पाणी पोहोचले आहे. दारणा, मुळा, गंगापूरची आवक बंद झालेली अाहे.निळवंडेतून दोन हजार क्युसेक आवक सुरू असून प्रत्यक्षात जायकवाडीत १८०० क्युसेक पाण्याची आवक आहे. सध्या जायकवाडीचा एकूण पाणीसाठा ९.४७ टक्क्यांवर आला आहे. पाणी जायकवाडीत येण्यापूर्वी ४.३३ टक्के साठा होता.
मुळा प्रकल्पातून १.७४ टीएमसी, गंगापूर प्रकल्पातून १.३६ टीएमसी, प्रवरातून ६.५० टीएमसी व दारणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन होते. त्यानुसार १ नोव्हेंबरला जायकवाडीत वरील धरणातून, तर गंगापूरमधून ३ नोव्हेंबरला पाणी सोडण्यात आले. यापैकी १ टीएमसीच्या जवळपास पाणी अहमदनगर व इतरत्र वळवण्यात आले. त्यामुळे जायकवाडीत ज्या वेगाने पाणी येणे अपेक्षित होते त्या वेगाने ते आले नाही. आता सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.