आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; औरंगाबाद मनपात अनेक फायली बंद होण्‍याची शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्‍य सरकारने नुकतीच 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये अवघ्‍या एका वर्षापूर्वी औरंगाबाद महापालिकेच्‍या आयुक्‍तपदाचा कारभार हाती घेणाऱ्या ओमप्रकाश बकोरिया यांची बदली करण्‍यात आली आहे. यासोबतच औरंगाबादच्‍या जिल्‍हाधिकारी निधी पांडे तसेच औरंगाबादेतील सिडकोचे व्‍यवस्‍थापकीय संचालक सुनील केंद्रेकर यांचीदेखील बदली करण्‍यात आली आहे. बकोरिया यांची अकोला येथे बदली झाली असून त्‍यांच्‍याकडे आता राज्‍य सहकारी बियाणे महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदाचा कारभार सोपवण्‍यात आला आहे.
 
यापूर्वी काही मुलाखतींमध्ये बकोरिया यांनी आपली बदली होणार अशी शक्यता वर्तवली होती. 14 तारखेपर्यंत ट्रांसफरचे आदेश येतील असे त्यांना वाटत होते. तारीख गेल्यानंतर सर्वांना ती केवळ एक चर्चाच वाटली. मात्र, सरकारने एकूणच 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केल्याने बकोरिया यांचा अंदाज खरा ठरला.
 
समांतर पाणी वाटप प्रकरणाच्या चौकशीसह विविध प्रकरणांमध्ये तपासाला सामोरे जाणाऱ्या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि पुढाऱ्यांनी बकोरिया यांच्या बदलीनंतर सुटकेचा निश्वास सोडला. या अधिकाऱ्यांनी बकोरिया यांच्‍या बदलीसाठी मंत्रालय स्‍तरापर्यंत प्रयत्‍न केल्‍याचेही वृत्‍त मध्‍यंतरी आले होते. त्‍यामुळे अधिकाऱ्यांच्‍या दबावामुळेच बकोरिया यांची बदली करण्‍यात आल्‍याची शंका उपस्थित केली जात आहे. बकोरिया यांच्‍या बदलीमुळे भ्रष्‍टाराच्‍या अनेक प्रकरणांच्‍या फायली बंद होण्‍याची शक्‍यता  वर्तविली जात आहे. एकूणच औरंगाबादकरांच्या प्रश्नांचा आणि शहराच्या विकासाचा विचार करता या बदलीवर अनेक प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित होत आहेत.  
 
मुगळीकर असणार औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्‍त
- औरंगाबाद विभागाचे विक्री व कर विभागाचे सहआयुक्‍त डी.एम. मुगळीकर हे औरंगाबाद महापालिकेचे आयुक्‍त म्‍हणून रुजू होणार आहेत.
 
कोणाची कुठे झाली बदली?
1) सुनिल केद्रेंकर (औरंगाबाद सिडको, व्‍यवस्‍थापकीय संचालक) यांची औरंगाबाद महावितरण, व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी (जॉईंट एमडी) बदली.
2) निधी पांडे (औरंगाबाद जिल्‍हाधिकारी) यांची मुंबई येथे राजीव गांधी आरोग्‍य योजना सोसायटीच्‍या सीईओपदी बदली करण्‍यात आली.
3) नवल किशोर राम (बीड, जिल्‍हाधिकारी) हे औरंगाबादचे नवे जिल्‍हाधिकारी असणार आहेत.
4) शितल उगले (रायगड, जिल्‍हाधिकारी) यांची सिडकोच्‍या सह व्यवस्थापकीय संचालक पदी औरंगाबाद येथे बदली.
5) अमोल येडगे (हिंगोली, सहाय्यक जिल्‍हाधिकारी) यांची नाशिकच्‍या सहाय्यक जिल्‍हाधिकारीपदी बदली.
6) दीनेश वाघमारे (पिंपरी चिंचवड, महापालिका आयुक्‍त) यांची समाजिक कल्‍याण विभागाच्‍या सचिवपदी बदली.
7) एकनाथ दवळे (नाशिक, विभागीय आयुक्‍त) यांची जलसंधारण मंत्रालयाच्‍या सचिवपदी बदली.
8) श्रीवान हार्डिकर (नागपूर, महापालिका आयुक्‍त) यांची पिंपरी चिंचवड, महापालिका आयुक्‍तपदी बदली.
 
काही महत्त्वाच्या बदल्या...
9) प्रशांत नारनवरे – पालघर जिल्हाधिकारी
10) अविनाश सुभेदार – कोल्हापूर जिल्हाधिकारी
11) श्वेता सिंघल – सातारा जिल्हाधिकारी
12) जी. श्रीकांत – नांदेड जिल्हाधिकारी
13) आर. व्ही. गमे – उस्मानाबाद जिल्हाधिकारी
14) अभिजीत बनगर – अमरावती जिल्हाधिकारी
15) सी. एल. पुलकुंदवार – बुलडाणा जिल्हाधिकारी
16) एम. देवेंद्र सिंग– लातूरचे जिल्हाधिकारी
17) विजय झाडे – क्रीडा विभागाचे आयुक्त
18) अश्विनी जोशी – उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त
19) श्रवण हर्डीकर – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त
20) अश्विन मुद्गल – नागपूर महापालिका आयुक्त
21) महेश झगडे – नाशिकचे विभागीय आयुक्त
22) सी. एन. दळवी – पुण्याचे विभागीय आयुक्त
23) सुरेंद्र बागडे – बेस्टचे महाव्यवस्थापक
24) नितीन गद्रे – पर्यटन विभागाचे सचिव
25) एकनाथ डवले – जल संवर्धन विभागाचे सचिव
 
पुढील स्लाइडवर वाचा नवे अधिकारी जुन्या गाण्यांचे दर्दी...
 
बातम्या आणखी आहेत...