आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओपीडी होणार तरी कधी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सातारा येथील उपआरोग्य केंद्र)
औरंगाबाद- सातारा परिसराचा मनपात समावेश झाल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी २६ मे रोजी साताऱ्यातील उपआरोग्य केंद्राच्या ठिकाणी पालिकेचा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची घोषणा केली, परंतु येथील इमारत जिल्हा प्रशासनाची असल्याने ती मनपाला देण्यास जिल्हा परिषदेने थेट नकार दिला आहे. त्यामुळे तुपे यांनी घोषित केलेली ओपीडी होणार तरी कुठे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
सातारा ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये विलिनिकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील उपआरोग्य केंद्र बंद केले. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. संबंधित इमारत ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा प्रशासनास देण्यात आली होती. सातारा-देवळाई साठी स्वतंत्र ओपीडी अत्यंत गरजेची असून तत्काळ देण्याचे आश्वासन तुपे यांनी दिले. त्यासाठीचा कुठलाही अभ्यास त्यांनी केला नाही. पालिकेने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली असता प्रशासनाने मात्र उपआरोग्य केंद्राची जागा आमची असून ती देण्यास नकार दिला . त्यामुळे आता प्रशासनाच्या वादामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कोलमडलेली आरोग्य सेवा कधी सुरू होणार,असा प्रश्न विचाराला जात आहे. गावकऱ्यांनी विचारला आहे.
समस्या काय ? : आरोग्यकेंद्र असताना गर्भतील महिलांची नोंदणी करणे, लसीकरण करणे, रोगराई पसरल्यास परिसरामध्ये फवारणी करणे तसेच जन्माला आलेल्या बाळाची पाच वर्षांपर्यंत लसीकरणासोबतच नोंदणी ठेवणे आदी कामे केली जात होती. गरीब घरातील सदस्य आजारी पडल्यास त्याला थेट घाटी येथे तपासणी जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
फायदा काय ?
पालिकेची ओपीडी येथे सुरू झाली तर जवळपास पन्नास टक्के नागरिकांना प्रथमोपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल. सातारा गाव तसेच परिसरामध्ये सुद्धा अनेक कुटुंबे रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे त्यांना नेहमीच खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ओपीडी सुरू केल्यास प्राथमिक उपचार घेणे सोपे होऊन औषधांसाठीचा होणारा खर्च वाचेल.
जागेचा शोध घेणार
- जिल्हाप्रशासनाने ओपीडीसाठीची नियोजित जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तेथे ओपीडी सुरू होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार.
जयश्री कुलकर्णी, आरोग्य अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...