आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Operation On Baby Child Issue At Aurangabad, Divya Marathi

एक वर्षाच्या चिमुरडीच्या अन्ननलिकेतून काढला सेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जालान बुद्रुक (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील नंदिनी गायकवाड या एक वर्षाच्या चिमुरडीने रिमोटमधील लिथियम सेल गिळला होता. सेलमधील अँसिड अन्ननलिकेत पसरल्याने तिच्या जीवितास धोका निर्माण झाला. परंतु घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाच्या डॉ. जीवन वेदी यांनी ‘इसो फेगो स्कोप’ ही प्रक्रिया करून सेल बाहेर काढल्याने नंदिनीला जीवदान मिळाले आहे.

22 मे रोजी नंदिनीने खेळता खेळता 50 पैशांच्या आकाराचा सेल गिळला. हा लिथियम सेल तिच्या अन्ननलिकेत जाऊन अडकला. त्यामुळे श्वास रोखला जाऊन जीव जाण्याची भीती होती. त्याच दिवशी पालकांनी तिला पाचोर्‍याच्या खासगी डॉक्टरांकडे नेले. त्यांनी तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेथे एक्स रे काढल्यानंतर अचूक स्थिती लक्षात येताच त्यांनी औरंगाबादमध्ये घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. 23 मे रोजी रात्री नंदिनी घाटीत दाखल झाली. पुन्हा एक्स रे काढून सेल अडकलेले अचूक ठिकाण कळाल्यानंतर ‘इसो फेगो स्कोप’ या प्रक्रियेचा वापर करून 24 मे रोजी 15 मिनिटांत डॉक्टरांनी सेल बाहेर काढला. सेलमधून अँसिड बाहेर येत होते. यामुळे नंदिनीच्या अन्ननलिकेला सूज येऊन काळपटपणा आला होता. नाक-कान-घसा विभागाचे डॉ. जीवन वेदी यांच्या मार्गदश्रनाखाली डॉ. अनुश्री बजाज, डॉ. धमेंद्र राय, डॉ. मीनाश्री सोळुंकी यांनी उपचार केले. भूलतज्ज्ञ डॉ. ज्योती कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.

पालकांनी लक्ष ठेवावे
नंदिनीला उपचार मिळण्यास उशीर झाला असता तर तिचा जीव गेला असता. पालकांनी कटाक्ष ठेवायला हवा. एक वर्षाच्या मुलीची अन्ननलिका अतिशय नाजूक असते, याशिवाय तिने गिळलेल्या लिथियम सेलमधून अँसिड बाहेर येऊ लागले होते, त्याचा स्राव जास्त झाला असता तर तिला जीव गमावण्याची वेळ आली असती. पालकांनी मुलांवर कटाक्षाने नजर ठेवणे गरजेचे आहे. डॉ. जीवन वेदी, विभागप्रमुख नाक-कान-घसा