आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघु उद्योजकांसाठी उघडली संधीची दारे, "बायर-सेलर मीट’चा व्यवसायवृद्धीसाठी होणार फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये" बायर सेलर मीट'च्या निमित्ताने सिमेन्स आणि एंड्रस हाऊजर या दोन कंपन्यांच्या प्रमुखांनी लघु उद्योजकांसमोर कोट्यवधीच्या खरेदीच्या संधीची दारे खुले करून दिली आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्याचे प्रमुख उपस्थित असल्यामुळे लघु उद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे या मीटच्या माध्यमातून आगामी काळात अंदाजे १०० कोटी रुपयांचा व्यवसाय स्थानिक उद्योजकांना मिळण्याची शक्यता आहे.

"बायर सेल'ची दुसरी परिषद रामा इंटरनॅशनलमध्ये पार पडली. यात १०९ उद्योजकांनी सहभाग घेतला. लघु उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी संधी मिळावी यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कंपन्यांना लागणाऱ्या उत्पादनाचे प्रदर्शनदेखील भरवण्यात आले होते. मल्टिनॅशनल कंपन्यांसोबत लघु उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत नाहीत. मात्र या मीटच्या माध्यमातून लघु उद्योजकांना थेट त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे यामध्ये चर्चा करणाऱ्या व्यक्ती खरेदीचे निर्णय घेणाऱ्या अधिकारपदावरच्या होत्या. सिमेन्सच्या वतीने उपाध्यक्ष अविक रॉय, महेंद्र वाणी वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशिवाय प्रतीक धाराशिवकर, उदय लहाने,राहुल कुलकर्णी, महेश निजतंते याच्यासह १२ जणांची टीम उपस्थित होती. तर एंड्रस हाऊजरचे अध्यक्ष एन.श्रीराम आणि नरेंद्र जोशी वरिष्ठ व्यवस्थापक यांच्यासह चार जणांची टीम चर्चा करत होती. या सर्वांनी जवळपाच पाच तास लघु उद्योजकांसोबत संवाद साधला.

बाहेर जायचे कशाला
शंभर कोटींपेक्षा अधिकच्या व्यवसायाचे दालन खुले झाले आहे. मल्टिनॅशनल कंपन्यांकडे व्यवसाय असेल तर बाहेर जायची गरज नाही. बालाजीशिंदे अध्यक्ष मसिआ

संधीची माहिती मिळाली
मोठ्या कंपन्यांसोबत थेट व्यवहार करणे लघु उद्योजकांना शक्य होत नाही. मात्र या परिषदेच्या माध्यमातून थेट अध्यक्षासोबत संवाद करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांना काय हवे आहे हे कळाले. राजेंद्रभंडारी, लघु उद्योजक

खरेदीदार तयार आहेत
नेहमी विकणारा त्याच्या मालाचे प्रदर्शन लावतो. मात्र इथे खरेदीदार भेटीस आले आहेत. त्यामुळे लघु उद्योजकांनादेखील व्यवसायवाढीसाठी चांगली संधी या निमित्ताने मिळाली आहे. दीपकतोष्णीवाल, लघु उद्योजक

इतर उत्पादन कळाले
इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादने आहेत, याची माहिती नव्हती. त्यामुळे आगामी काळात इतर उत्पादने पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार. धनंजयबडवे, लघु उद्योजक

गेल्या वर्षी पहिल्या बायर सेलर मीटमधून आठ करार करण्यात आले होते. यामध्ये चार करार अंतिम झाले. तर उर्वरित चार करार अंतिम टप्प्यात आहेत. या माध्यमातून शंभर कोटीचा व्यवसाय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या मीटमधूनदेखील १०० ते दीडशे कोटींची उलाढाल होणार असल्याचा विश्वास सीआयआयचे उपाध्यक्ष संदीप नागोरी यांनी व्यक्त केला.

असा होतो व्यवहार
मल्टिनॅशनलकंपन्या खरेदीच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतात. या मीटनंतर ज्या उद्योजकांसोबत चर्चा झाली आहे त्यांच्या कंपन्यांना भेट दिली जाईल. त्यांनतर त्यांचे तंत्रज्ञान त्याच्या कामाची गुणवत्ता, सर्टिफिकेशन या सर्वांची चाचपणी केली जाते. त्यानंतर हा व्यवहार केला जातो. त्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो.

हे तर नवरा बायकोसारखे नाते
एंड्रेसहाऊजरचे अध्यक्ष एन.श्रीराम म्हणाले, ज्या पद्धतीने नवरा बायकोशिवाय संसाराचा गाडा चालू शकत नाही त्याचप्रमाणे बायर सेलरचे आणि छोट्या उद्योजकांसोबत मोठ्या उद्योजकांचे नाते आहे. आमच्या कंपनीची भारतातून ४०० कोटींची खरेदी होते. त्यापैकी औरंगाबाद विभागातून केवळ कोटींची होते. त्यामुळे लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी आहेत. सिमेन्सचे उपाध्यक्ष रॉय म्हणाले, लघु उद्योजकांनी उत्तम गुणवत्ता द्यावी खरेदीदार तयार आहेत. गुणवत्ता आणि डिलिव्हरीची हमी असेल तर कंपन्याकडून खरेदी केली जाईल, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...