आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डीच्‍या स्मारकास संभाजी ब्रिगेडचा विरोध, काही झाले तरी स्‍मारक होऊ देणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना तात्काळ \'फाशी\' हिच खरी श्रद्धांजली असे म्‍हणत संभाजी ब्रिगेडेच्‍या कार्यकर्त्‍यांनी कोपर्डीत उभारल्‍या जाणा-या स्‍मारकाचा निषेध केला. - Divya Marathi
आरोपींना तात्काळ \'फाशी\' हिच खरी श्रद्धांजली असे म्‍हणत संभाजी ब्रिगेडेच्‍या कार्यकर्त्‍यांनी कोपर्डीत उभारल्‍या जाणा-या स्‍मारकाचा निषेध केला.
औरंगाबाद- कोपर्डीतील स्मारक हा निव्वळ मूर्खपणा आहे. १३ जुलै रोजी यासंदर्भात आयोजित कार्यक्रम रद्द करावा, अन्यथा तो उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत स्मारक होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
 
प्रदेश प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ब्रिगेडच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात स्मारकास विरोधाचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कथित संत भय्यू महाराज कोपर्डीत पीडितेचे स्मारक उभारून ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत. स्मारके शौर्य पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी असतात. कोपर्डीत जे घडले त्याने प्रत्येक माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. अशा घटनेचे स्मारक उभारून माणुसकीला काळीमा फासण्याचे काम करू नये, अशी ब्रिगेडची भूमिका आहे.
 
दरम्यान, कोपर्डी प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
 
हेही वाचा... 

 
बातम्या आणखी आहेत...