आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oppostion Leader Issue In Corporation Very Soon Solaved

महापालिका विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा लवकरच सोडवू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते म्हणून रावसाहेब गायकवाड यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नियुक्तिपत्र देऊन अकरा दिवस उलटले. मात्र, अद्यापही या पदाचा पेच कायम आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून येत्या तीन दिवसांत हा तिढा सोडवला जाईल, अशी माहिती शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

ठाकरे यांनी 4 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते म्हणून गायकवाड यांना नियुक्तिपत्र दिले आहे. गायकवाड यांनी ते पत्र शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम यांच्याकडे सोपवले आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतलेला नाही.

पाच नगरसेवकांचा सुरुवातीपासून विरोध : डॉ. जफर खान यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यापूर्वी नगरसेवकांची मते जाणून घेण्यात आली होती. प्रमोद राठोड, रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, बाळूलाल गुजर आणि रवी कावडे यांनी असहमती दर्शवली होती. मात्र इतर नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची या पदावर वर्णी लागली. मात्र आता डॉ. खान यांना विरोध करणार्‍या गायकवाड यांचीच या पदी नियुक्ती होणार असल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला चांगलेच तोंड फुटले आहे.
पदाधिकार्‍यांचा निर्णय मान्य राहील

माणिकराव ठाकरे साहेबांनी मला 4 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेतेपदाचे नियुक्तिपत्र दिले. ते पत्र मी शहराध्यक्षांकडे दिले आहे. आता ते याबाबत पुढील निर्णय घेतील. पदाधिकार्‍यांचा निर्णय मान्य राहील. रावसाहेब गायकवाड, नगरसेवक

पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करू
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गायकवाड यांना विरोधी पक्षनेतेपदाचे नियुक्तिपत्र दिले असून ते दोन दिवसांपूर्वी आमच्यापर्यंत पोहोचले आहे. सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांची बैठक घेऊन येत्या तीन दिवसांत या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. अँड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस