आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पुन्‍हा अवयव दान: ह्रदय मुंबईला, लिव्हर पुण्याला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात काही दिवसांपूर्वी राम मगर या तरूणाच्‍या ब्रेन डेडमुळे त्‍याचे अवयवदान करण्‍यात आले होते. यामुळे चार रूग्‍णांचे प्राण वाचले होते. आता पुन्‍हा एकदा असाच प्रयोग औरंगाबादेत घडत आहे.
ब्रेन डेड झालेल्या एका रुग्णाचे हृदय, लिव्हर आणि दोन किडन्‍यांचे प्रत्यारोपण करण्यासाठी आज सकाळपासून तयारी सुरु आहे. प्रशासनाने या प्रक्रियेत पुढाकार घेतला आहे. यातील हृदय मुंबई, लिव्हर पुण्याला पाठवण्यात येणार असून दोन्ही किडन्‍यांचे औरंगाबादेतील बजाज हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण केले जाणार आहे.
ग्रीन कॉरिडॉरची मदत
अवयवदान ते शस्त्रक्रियेची प्रक्रिया यशस्वी व्‍हावी यासाठी पुन्हा एकदा ग्रीन कॉरिडॉरची मदत घेतली जाणार आहे. यामार्फत हृदय, लिव्हर आणि किडनीचा प्रवास होणार आहे. आज सकाळपासून या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सुनील बुधवंत यांच्‍या परिवाराने घेतली राम मगरकडून प्रेरणा..