आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवयवदान केलेल्या रामच्या आईचा सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाराजानेवारीला अपघातात गंभीर जखमी झालेल्या राम मगर या तरुण मुलाचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय घेणाऱ्या आई मंदाबाई मगर यांच्या निर्णयाने तिघांना जीवदान मिळाले. अशा धीरोदात्त माउलीचा सत्कार मिडटाऊन लायन्स मेडिकल सर्व्हिसेस ट्रस्टच्या वतीने २७ जानेवारीला करण्यात येणार आहे. रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये दुपारी वाजता हा सोहळा होणार आहे.
यावेळी फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया हे हृदय देऊ केलेल्या व्यक्तींसाठीच्या खास रूग्णवाहिकेचे लोकार्पण वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ करणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहील. रामच्या अवयव प्रत्यारोपणाने औरंगाबादच्या वैद्यकीय विश्वात इतिहास बनवला. यामुळे गेल्या वर्षांपासून अनिर्णित असलेली झेडटीसीसी कमिटी अवघ्या १० दिवसांत स्थापित झाली. रामच्या अवयवांचे दान करण्याचा आईचा हा निर्णय पुढील अनेक रूग्णांना जिवदान देणारा आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहून मंदाबाईंचा विश्वास वाढवावा, त्यांना सन्मान द्यावा असे आवाहन लायन्स सेंटरचे अध्यक्ष चंद्रकांत मालपाणी, सचिव कमलेश धूत, लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष मनोज पगारिया आणि सचिव महेश राणा यांनी केले आहे.