आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयांना सहज शक्य होणार ब्रेनडेड रुग्णाचे अवयव जपणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सात महिन्यांत शहरात सहा अवयवदान यशस्वीरीत्या झाले तरी गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडत ब्रेनडेड रुग्णाच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या रुग्णालयांच्या शुल्काचा प्रश्न रखडला होता. मात्र, मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाने दोन लाख रुपये मुंबई झेडटीसीसीकडे (झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी) जमा केले असून ब्रेन डेड रुग्णाचे अवयव जपण्यातील अडचणी दूर होतील, असे समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले.
१४ जानेवारी रोजी राम मगर या तरुणाच्या अवयवदानाचा पहिला प्रयोग औरंगाबादेत झाला. त्यानंतर झेडटीसीसीची कार्यपद्धती, रुग्णालयांनी केलेला खर्च आदींबाबत प्रश्न उपस्थित होत होते. त्याची उच्चस्तरावर दखल घेतली जाऊन वेगवान हालचाली करण्यात आल्या. तीन वर्षांपासून रेंगाळलेली झेडटीसीसी समितीची स्थापन झाली. तत्पूर्वी शहरात झालेल्या अवयवदानात ब्रेनडेड रुग्णाची काळजी घेणाऱ्या रुग्णालयांनीच हा खर्च उचलला. नियमानुसार हा खर्च झेडटीसीसीने देणे अपेक्षित आहे. मात्र, समिती स्थापन झालेली नसल्याने शुल्क नेमके कुणाकडे जमा करावे हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, ही समिती स्थापन झाली असून मागील महिन्यात बँक खातेही उघडले आहे. त्यामुळे एकही रुग्ण ब्रेनडेड झाला तरी अवयवदानासाठी त्याची प्रकृती स्थिर ठेवण्याकरिता संबंधित रुग्णालयांना शुल्क देण्याची व्यवस्था झाली आहे. अवयवदान उपक्रमात सहभागी होण्यासाठी २५ हजारांचे शुल्क भरून रुग्णालयांना समितीचे सदस्य व्हावे लागते. त्यानुसार शहरातील माणिक, धूत आणि एमजीएम रुग्णालयाने सदस्यत्व स्वीकारले आहे. मात्र, सर्वप्रथम अवयवदान घडवून आणणारे युनायटेड सिग्मा तसेच दोन ते तीन वेळा किडनी स्वीकारलेल्या बजाज रुग्णालयाने अद्याप सदस्यत्व घेतलेले नाही. दरम्यान, झेडटीसीसीकडे शुल्क भरण्याबद्दल चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय झालेला नाही. नेमके शुल्क कुठे भरावेत हेही निश्चित नसल्याने आम्ही शुल्क जमा केले नाहीत, असा मुद्दा किडनी प्रत्यारोपण केलेल्या खासगी रुग्णालयांनी मांडला आहे.

अशी आहे सातसदस्यीय समिती : अध्यक्षडॉ. सुधीर कुलकर्णी, सचिव (अधिष्ठाता) डॉ. चंद्रकांत म्हस्के, एमजीएमचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, धूतचे डॉ. विजय बोरगावकर, बजाजचे डॉ. व्यंकटेश होळसांबरे, माणिकचे डॉ. राजेंद्र प्रधान आणि घाटीचे डॉ. अजित दामले.

डॉ. कुलकर्णी
पुण्यात घेतला जात नाही निधी
^पुण्यात झेडटीसीसीने रुग्णालयांना अद्याप शुल्क आकारले नाही किंवा दिलेे नाही. मुंबईत शुल्क घेतले जाते. प्रत्येक ठिकाणी नियम वेगळा आहे. -डॉ. अभय उपरीकर, अध्यक्ष, झेडटीसीसी, पुणे

{एखादा रुग्ण ब्रेन डेड होताच समितीला कळवावे लागेल.
{अवयवदान चळवळीत सहभागी होण्यासाठी रुग्णालयांना शुल्कासह नोंदणी करावी लागेल.
आता अशी होईल प्रक्रिया
{रुग्णांची यादी तपासून ब्रेनडेड रुग्ण आणि ज्या रुग्णाच्या शरीरात अवयव ट्रान्सप्लांट करायचे त्याचे शरीर अवयव स्वीकारते किंवा नाही याची चाचपणी समिती करेल.
{समिती हे शुल्क ब्रेनडेड रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवणाऱ्या रुग्णालयाला देईल.
{जिथे प्रत्यारोपण होईल ते रुग्णालय झेडटीसीसीकडे शुल्क जमा करेल.
बातम्या आणखी आहेत...