आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Organic Fertilizer Production,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कच-यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करून निर्माण केला आदर्श

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपल्या भागातील कचरा उचलला जात नाही, अशी नेहमी ओरड होते. त्यासाठी मनपा प्रशासनाला दोषही दिला जातो. परंतु वसाहतीत निर्माण होणा-या कच-याची वॉर्डातच विल्हेवाट लावून अपनानगरातील महिलांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. ८० टक्के कचरा मार्गी लावून केवळ २० टक्के कचरा नारेगावच्या कचरा डेपोत पाठवला जात असून या महिलांना नगरसेविका साधना सुरडकर यांची साथ लाभली आहे.
अपनानगरमध्ये बॅडमिंटन हॉलच्या बाजूला मोकळ्या जागेत नागरिक कचरा टाकत होते. अनेकदा हा परिसर स्वच्छ करण्यात आला. पण पुन्हा त्याच ठिकाणी कचरा पडत होता. या भागातील जमुना मानधने यांनी कच-याच्या समस्येकडे लक्ष वेधले. पण कचरा टाकायचा कुठे हा मूळ प्रश्न होता. त्यामुळे महिलांनी नगरसेविका साधना सुरडकर यांचे सहकार्य घेतले. सिंधी कॉलनीमध्ये राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाप्रमाणे प्रकल्प राबवण्याचे ठरले. सुरडकर, काही महिलांनी सिंधी कॉलनीत जाऊन कचरा जमवण्याची पद्धत माहिती करून घेतली. त्यानंतर सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांची भेट घेऊन या वॉर्डातील कचऱ्याबाबत काय करता येईल यावर विचारविनिमय केला. त्यानंतर बॅडमिंटन हॉलच्या जागेत दोन बाय तीनचे दोन खड्डे करण्यात आले. यामध्ये ओला कचरा टाकून सेंद्रिय खताची निर्मिती केली जात आहे, तर सुक्या कच-याचेही दोन भाग केले जात आहेत. त्यामुळे नारेगावला फक्त २० टक्केच कचरा जातो. सिल्व्हर नेक्स्ट सोसायटीच्या परिसरातील ८० घरे यामध्ये सहभागी आहेत.
काय आहे प्रकल्प ?
प्रत्येक घरातून दररोज अर्धा किलो कचरा निघतो. मनपाची घंटागाडी आली की ओला आणि सुका कचरा वेगळा टाकला जातो. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यासोबत दररोज कचरा वेचणारा माणूस येतो. ६० टक्के सुका कचरा वेचणारा घेऊन जातो. तर २० टक्के ओला कचरा खड्ड्यात टाकला जातो. त्यापासून खतनिर्मिती होते. तर २० टक्के कचरा नारेगावला जातो.

खतनिर्मिती शक्य
ओला आणि सुका कचरा असे घरातच विभाजन केले जाते. कचऱ्यापासून रोगराई होण्याचा धोकाही आता नियंत्रणात आला आहे. सीआरटीतर्फे सनवीर छाबडा आणि स्नेहा बक्षी यांनी विशेष मार्गदर्शन केले. साधना सुरडकर, नगरसेविका