आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"व्हॅलेंटाइन डे': प्रेमीयुगुलांवर संघटनांचे लक्ष, विरोध करण्याचा दिला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शनिवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. तरुण-तरुणी महाविद्यालयात, रस्त्यावर, उद्यान आदी ठिकाणी एकत्र जमतात. परंतु कोणी अश्लील चाळे करताना आढळले तर त्याचा विरोध केला जाईल, असा इशारा युवा सेना, भाजयुमो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
मनविसेचे जिल्हाध्यक्ष हनुमान शिंदे म्हणाले, रस्त्यावर संस्कृतीच्या विरोधात काही घडले तर आम्ही त्यांना मनसे स्टाइलने हिसका दाखवू. युवा सेनेचे शहर अधिकारी मिथून व्यास म्हणाले, हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही विरोध करणार नाही. पण चुकीचा प्रकार करताना आढळल्यास धडका शिकवू. युवा मोर्चाचे मनोज भारस्कर यांनी सांगितले की, प्रेमीयुगुले, मित्र-मैत्रिणींनी सार्वजनिक ठिकाणी काही चुकीचे केले तर त्यांना समज देऊ. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील यांनी विरोध करणार नसल्याचे म्हटले. जमाअत-ए-इस्लामी िहंदचे प्रदेशाध्यक्ष आदिल मदनी यांनी तरुण-तरुणींना मारहाण करणे मानवतेच्या िवरोधात असल्याचे सांगितले. दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी कडक बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले.