आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organs Replantation Delayed Due To Plane In Aurangabad

विमानांच्या प्रतीक्षेत 'दान' लांबले, औरंगाबादच्या वैद्यकीय इतिहासातील नवा अध्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगाव मही येथील तरुण अपघातात ब्रेन डेथ झाला. त्याचे चार अवयव प्रत्यारोपणासाठी काढून मुंबईला पाठवण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री करण्यात येणार होती. मात्र, विमान आल्यामुळे ती पहाटेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. औरंगाबादेत पहिल्यांदाच होणाऱ्या अशा कृतीसाठी सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत होत्या.
औरंगाबाद - बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील राम मगर या तरूणाला १२ जानेवारीला अपघात झाला आणि त्याचा ब्रेनडेड झाला. अशा परिस्थितीत त्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडन्या दान करण्याचा निर्णय त्याच्या विधवा आईने घेतला. त्यासाठी गुरुवारी दिवसभर सिग्मा हाॅस्पिटलचे डाॅक्टर्स, पोलिस यंत्रणा, विमानतळ अधिकारी युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम करीत होते. मात्र, गुरुवारी रात्री विमान येऊ शकल्याने पहाटे ही शस्त्रक्रीया सुरू करण्याचा निर्णय डाॅ. उन्मेष टाकळकर यांनी घेतला होता.
नोकरी मिळवायची अन् आईला, भावांना सुखी करायचे, असे स्वप्न उराशी बाळगत राम सुधाकर मगर या २४ वर्षांच्या युवकाची धडपड सुरू होती. १२ जानेवारी रोजी अकोल्याला तो मुलाखतीसाठीच गेला होता. तेथून परतताना झालेल्या दुर्दैवी अपघाताने त्याचे ते स्वप्न अपूर्ण राहिले. पण हे जग सोडण्यापूर्वीच तो चार जणांना जीवदान देऊन जाईल.

मगर कुटुंबाची १८ एकर शेती. मोठा भाऊ शाम शेती बघतो. रामने बी.एस्सी. एग्रिकल्चरची पदवी मिळवली आणि नोकरीचा शोध सुरू केला. मंगळवारी मुलाखतीसाठी अकोल्याला गेला. अकोल्याहून गावाकडे परतत असताना महेकर-मालेगाव रोडवरील चांडस येथे रात्री ८.३० च्या सुमारास त्याची दुचाकी गतीरोधकावर घसरली. दुचाकी पुढे तर तो मागील बाजूस फेकला गेला अन् त्याच्या मेंदूला जबर मार बसला.

अन् भाऊ घटनास्थळी पोहोचले
अकोल्याकडूनगावाकडे निघालेले रामचे चुलत भाऊ विनोद पाचच मिनिटांत अपघात स्थळी पोहोचले आणि रामला महेकर मल्टीस्पेशॅलिटी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी औरंगाबादेतील एमआयटी रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तिथे डॉ. अंशुल बगाडिया (मेंदू विकार शल्यचिकित्सक) यांनी उपचार केले. १३ जानेवारीला रात्री मेंदू मृत (ब्रेन डेथ) असल्याचे सांगितले.

काळीज गलबलले
मग रामचे काका सुभाष राजाराम मगर, मामा सिद्धेश्वर गाडगे यांनी रामच्या अवयवदानाचा विचार बोलून दाखवला. तो ऐकताच आई मंदा यांचे काळीज गलबलले. थोडा विचार करते, असे म्हणून त्या थांबल्या आणि आपला मुलगा तर गेला पण त्याच्या जाण्याने कुणाला जीवदान मिळत असेल तर काही हरकत नाही, असे म्हणत त्यांनी १५ मिनिटांनंतर होकार दिला. एमआयटी रुग्णालयात सुविधा नसल्याने सिग्मा हॉस्पिटलशी बोलणे झाले. गुरुवारी सकाळी १० वाजता सिग्मामध्ये दाखल करण्यात आले.

निर्णय बदलावा लागला
विमानसेवेशी बोलणी झाल्यावरच प्रत्यारोपणाचा निर्णय झाला होता. मात्र, ऐनवेळी विमानाचे वेळापत्रक बदलले. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारी केलेली असूनही ह्रदयाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय बदलावा लागला. डॉ. उन्मेष टाकळकर, सीएमडी सिग्मा हॉस्पिटल

नोकरी मिळाली होती
अकोल्यातील एका कंपनीत १६ युवकांमधून रामची निवड झाली होती. नोकरी मिळाल्याचे त्याने घरी मोबाईलवरून सांगितले होते. त्या आनंदातच तो वेगात गावाकडे निघाला होता. आमच्या घरात अघटित घटना घडली. मात्र, आमचा राम चार जणांमध्ये जिवंत राहिल, याचे समाधान आहे. मंदा वहिनींनी मन खूप मोठे केले. असे रामचे चुलत काका नागोराव मगर म्हणाले.

यांचा होता सहभाग
हृदयविकारतज्ज्ञ डॉ. आनंद देवधर,डॉ. उन्मेश टाकळकर, भूलतज्ज्ञ डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. सुजित खाडे, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार, डॉ. अंशुल बगाडिया यांच्यासह चेन्नई, मुंबईचे डॉक्टर.

मंदाबाईंनी घेतला जगावेगळा निर्णय
राम-शामआणि त्यांना दोन बहिणी असे चार मुलांचे कुटूंब मंदा मगर (माहेरचे आडनाव गाडगे) यांनी पतीच्या मृत्यूनंतर मोठे केले. २० वर्षांपूर्वी सुधाकर मगर यांचा मृत्यू झाला. शाम बारावी पर्यंत शिकला आणि घरची १८ एकर कोरडवाहू शेती करतो. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. मंदाबाईंनी मुलांना वाढवले, शिक्षणही दिले. मात्र, शामने शेतीचा निर्णय घेतला आणि रामला उच्च शिक्षणाला पाठवण्याचे ठरले. त्यानुसार रामनेही उत्तमपणे बुलडाणा येथील महाविद्यालयात बी.एस्सी. पूर्ण केले. चांगली नोकरी करण्याची आशा उराशी बाळवून तो मुलाखतीसाठी गेला होता. पुढील काळात घरच्या शेतीचेही रूपडे पालटण्याचे त्याचे स्वप्न होते. मग मंदाबाईंनी लगेच संमत्ती दिली. घरातील लाडाचा हा पोर आपल्यात राहणार नाही. पण चार माणसांत माझा राम कायम जिवंत राहिल असे त्या माऊलीने सांगितले. मंदाबाईंचे वडिल समाजकार्यात होते. त्यांच्या काही आश्रमशाळा आहेत. मगर कुटुंबीय वारकरी परंपरेचे आहे. त्यातील शिकवणुकीनुसारच निर्णय घेतला, असे मगर कुटुंबीयाने सांगितले.

गुरुवारी १० वा. सिग्मा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर
१४रोजी सकाळी दहा वाजता सिग्माचे सीएमडी डॉ. उन्मेष टाकळकर, भूलतज्ज्ञ डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. सुजित खाडे, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. पांडुरंग वट्टमवार, डॉ. अंशुल बगाडिया यांनी ब्रेन डेथ असल्याचे घोषित केले. मुंबईच्या झोनल कॅडेव्हर ट्रान्सप्लांट कमिटीशी चर्चा करण्यात आली. दुपारी मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयाची टीम आली. त्यात लिव्हर (यकृत) प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. गुरुप्रसाद शेट्टी, डॉ. गौरव चौबळ, झेडटीसीसीचे समन्वयक मुश्ताक खान,सुजाता ढोके यांचा समावेश होता. चेन्नई येथून हृदय प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. मुरली आले होते.
पुढे वाचा.. अँब्युलन्स थेट विमानाजवळ