आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर टाकलेली दोन बालके ‘साकार’मध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनाथ बालकांचा सांभाळ करणार्‍या साकार संस्थेत दोन बालके दाखल झाली आहेत. 17 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता नांदेड रेल्वेस्टेशन येथे पुरुष जातीचे पाच दिवसांचे अर्भक सापडले होते. दोन मे रोजी लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथील टोलनाक्यावर स्त्री जातीचे तीन महिन्यांचे बाळ आढळले होते. ही दोन्ही बालके बाल कल्याण समितीमार्फत आज साकार संस्थेत दाखल करण्यात आली. ज्यांना त्यांचा सांभाळ करण्याची इच्छा असेल त्यांनी 30 दिवसांच्या आता साकार संस्था, चंद्रपुष्प संकुल, पद्मावती हॉस्पिटलशेजारी, काल्डा कॉर्नर येथे संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक विजय राजाळे यांनी केले आहे.